ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा पर्स व रोख रक्कम केली परत !

ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा पर्स व रोख रक्कम केली परत !
———————————————————————
लोहा (रत्नाकर महाबळे) आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि महागाईच्या काळात माणसातील माणूस पण हरवून जात आहे जो तो पैशामागे आणि आपल्या जीवनात ऐश्वर्य कसे मिळेल यासाठी धडपड करत असतो पण अशा या युगात देखील कलाल पेठ भागातील ऑटोचालक अमन लदाफ यांने आपल्या आठवत विसरलेली एका महिलेची पर्स व रोख रक्कम परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जुन्या लोहा शहरातील कलाल पेठ भागात राहणारा अमन लदाफ हा ऑटो चालून आपला उदरनिर्वाह करून त्यावर आपला प्रपंच चालवतो काल असाच ऑटो चालवत असताना त्याच्या ऑटो मध्ये वाजेदा कुरेशी ह्या इंदिरानगर भागातील प्रवासी बस स्थानकातून आपल्या घरी जाण्यासाठी ऑटो मध्ये बसले असता घाई गडबडीत त्यांनी रोख रक्कम 4700 रुपये आणि 25000 रुपये किंमतीचा मोबाईल असलेला पर्स ऑटो मध्ये विसरल्या पण ऑटो चालक अमन लदाफ यांच्या लक्षात आले त्याने क्षणाचाही विलंब न करता तो पर्स त्या महिलेच्या नातेवाईकांकडे देतो . ऑटो चालून महिन्याला मिळणारे 30 हजार रुपये त्याने एका झटक्यात कमावले असते पण त्याने तसे न करता आपली इमानदारी ठेवून त्याने तो पर्स परत केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आजच्या काळामध्ये देखील असे इमानदारी करणारे तरुण ऑटो चालक आहेत याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लोहा शहरातील हा ऑटो चालक अशा लोकांमुळेच आजही इमानदारी कायम टिकून आहे. पूर्वीही अनेक वेळा अमन याने असे आठवत विसरून राहिलेले मोबाईल त्याने परत केल्याचे सांगितले.
ही बाब लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयनले यांना कळाले त्यांनी देखील या ऑटो चालकास पोलीस स्टेशन मध्ये बोलू स्वागत केले आहे.


