Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहा तालुक्यातील नोंद नसलेल्यांना जन्म मृत्यू दाखवला तहसील कार्यालयात मिळणार — तहसीलदार विठ्ठल परळीकर !

लोहा तालुक्यातील नोंद नसलेल्यांना जन्म मृत्यू दाखला तहसीलदार कार्यालयात मिळणार-तहसीलदार विठ्ठल परळीकर
————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
जन्म मृत्यूची वेळेत नोंद नसल्याने ग्रामपंचायत तसेच नगर परिषद कार्यालयाकडून प्रमाण पत्र दिले जात नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते .राज्य शासनाच्या १२ मार्च २०२५ च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनीं बीडीओ लोहा तालुक्यातील ग्रामसेवक , नगर परिषद कर्मचारी याची बैठक घेतली व त्यांना नव्या नियमांची माहिती अवगत केली.तहसील कार्यालयात ग्रामीण व शहरी भागात रहिवासी असलेल्याना विलंबाने जन्म मृत्यूचा दाखला कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर मिळेल असे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सांगितले
राज्यात जन्म मृत्यू दाखल बाबत तक्रारी आल्या नंतर राज्य शासनाने १२ मार्च २०२५ रोजी नव्याने आदेश निर्गमित केले.त्या आदेशाच्या प्रभावीपणे अंमलबजावणी साठी बुधवार (२५ जून) रोजी तहसीलदार विठ्ठल परळीकर याच्या
उपस्थितीत तहसील सभागृहात बीडीओ ,नगर परिषद मुख्याधिकारी ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) , नगर परिषद संबधित विभागाचे कर्मचारी यांची बैठक पार पडली, नायब तहसीलदार अशोक मोकले, निवासी नायब तहसीलदार राजेश पाठक, .प स विस्तार अधिकारी मेहत्रे, महसूल सहायक सिद्धार्थ गायकवाड, यासह ग्रामसेवक उपस्थिती होते
शहरी भागात असलेल्याची नगर परिषदे मध्ये आणि गावातील रहिवासी याची त्या त्या ग्रामपंचायत मध्ये जन्म किंवा मृत्यू नोंद नाही .आणि त्यांना विलंब झाला आहे त्यांनी विहित नमुन्यात ग्रामपंचायत किंवा नगर परिषद येथे प्रस्ताव सादर करावा. खेड्यात ग्रामसेवक तर शहरी भागात नगर परिषद कर्मचाऱ्यांनी त्याची खातरजमा करावी व नोंद नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे त्यानंतर तहसीलदार याच्या समोर सुनावणी होईल.आणि चौकशी नंतर जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.त्या शासन आदेशातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून नोंद नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे तसेच अन्य माहिती तहसीलदार परळीकर यांनी उपस्थितीताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button