Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

सराईत आरोपी चंद्रकांत क्षीरसागर याचा लोहा पोलीस कडून हद्दपारीचा प्रस्ताव सादर !

सराईत आरोपी चंद्रकांत मोहन क्षीरसागर याचा हद्दपारीचा प्रस्ताव सादर !
——————————————–
लोहा (प्रतिनिधी )
नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातून सराईत आरोपी चंद्रकांत क्षीरसागर रा आडगाव ता लोहा यास हद्दपार करावे असा प्रस्ताव लोहा पोलीस ठाण्यातून पाठवला असल्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचाळकर यांनी सांगितले.
लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आडगाव येथील राहणारा चंद्रकांत मोहन क्षीरसागर हा व्यक्ती 2016 पासून सराईतपणे गुन्हे करत आहे. सदर व्यक्तीवर कायदेशीर गुन्हे दाखल आहेत अनेक वेळां प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली अनेक वेळा सुधारण्यासाठी संधी दिली पण तो एका राजकीय पक्षांच्या पदाधिकारी असल्याने त्याचा वागणूकीत कोणत्याही बदल झाला नाही.आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दखल घेत हा प्रस्ताव तयार केला असल्याचे माहिती लोहा पोलिसांनी दिली
सदर व्यक्तीची मागील ईतिहास पाहिला असता तो गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे दिसून येते आणि त्यासाठी अनेक वेळा पोलिसांनी त्याच्या हालचालीवर नजर ठेवली असता सदर वस्तीपासून कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होवू शकतो . सदर व्यक्ती हा जबरीचा किंवा बळाचा उपयोग करून गुन्हे करतो तसे अनेक गुन्हे त्याने केल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतर व्यक्तींनी अशा प्रकारचे गुन्हे होऊ नये यासाठी उपाय योजना आहे
सदर व्यक्तीवर पोलीस स्टेशन लोहा येथे बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीरपणे दंगा करणे, जबर मारहाण करणे, रेती चोरी करणे, अवैध हत्यार तलवार बाळगणे, सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे, सार्वजनिक मालमत्तेचे वीरूपण करणे अशा गुन्ह्यास अपप्रेरणा देणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीवर आतापर्यंत लोहा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 125 /2016 भारतीय दंड विधान कलम 147 148 ,149 ,326 ,324 ,504 ,506
गुन्हा क्रमांक – 165/2020
भादवी कलम- 379 रेती चोरी
गुन्हा क्रमांक – 61/2024
शस्त्र अधिनियम कलम – 4/25
गुन्हा क्रमांक – 56/2024
1)भादंवि कलम – 427, 34, 109
2) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि 1984,कलम – 3
3)महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधि.1995 कलम – 3
सदर आरोपीने आपल्या वडिलांच्या मदतीने बेकायदेशीर जमाव जमून जबर मारहाण केली असल्याबाबत पोस्टे लोहा येथे गुन्हा क्रमांक 125/2016 प्रमाणे सदरचा आरोपी व त्याचे वडील मोहन शामराव क्षिरसागर यांच्यावर गुन्हा दाखल आहे
तसेच सदर आरोपीचे वडील यांच्या घराला महिंद्रा फायनान्स यांनी माननीय न्यायालयाच्या आदेशाने सील लावून घर जप्त केले होते ते सील फोडून मा. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले व नुकसान केले म्हणून भारतीय दंड विधान कलम 188, 427 प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये पण आरोपी चंद्रकांत क्षीरसागर याचा सहभाग आहे का हे तपास चालू आहे. सदरचा आरोपी हा वारंवार गुन्हे करण्याचा सवयीचा असून तो सामान्य माणसाच्या जीवितास मालमत्तेस धोका निर्माण करण्याचा दिसून येत आहे सदर आरोपीस सुधारण्याची अनेक वेळा संधी दिली पण त्याच्या वर्तनात काही बदल घडत नसल्याकारणाने आणि सदरचा आरोपी हा एका पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे भविष्यकाळात निवडणुकीची जी आचारसहिता आहे ती भंग होण्याची
शक्यता या गुन्हेगार वृत्तीच्या आरोपीकडून भंग होऊ शकते त्यामुळे सदर आरोपीस नांदेड ,परभणी , लातूर या जिल्ह्यातून हद्दपार करावे असा प्रस्ताव लोहा पोलीस स्टेशनच्या वतीने पाठवण्यात आला असल्याची माहिती लोहा पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button