प्रत्येक मतदारांनी गणना फाॅर्म भरुन देणे अनिवार्य — तहसीलदार विठ्ठल परळीकर !

प्रत्येक मतदारांनी गणना फॉर्म ( ईएफ ) भरून देणे अनिवार्य -तहसीलदार विठ्ठल परळीकर
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
.भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्याचा विशेष सखोल पुननिरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम लोहा तालुक्यात ३० जून ते २९ जुलै या काळात राबविण्यात येत आहे.त्यासाठी प्रत्येकांच्या घरी बीएलओ येणार आहेत ते गणना फॉर्म (ईएफ ) देतील तो सर्व मतदारांनी भरून देणे अनिवार्य आहे.फॉर्म भरून देणार नाहीत त्याची नावे मतदार यादीतून वगळली जातील तेव्हा मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेसाठी सहकार्य करावे असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी व तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे
भारत सरकार निवडणूक आयोगाने मतदार यादी पूरनिरीक्षण ( एसआयआर) कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे याबाबत तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सांगितले की लोहा तालुक्यात 30 जुन ते 29 जुलै 2026 पर्यंत मतदार केंद्रस्तरीयत अधिकारी (बिएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. त्यावेळी प्रत्येक मतदारासाठीचा गणना फॉर्म (EF) देतील तेव्हा तो फॉर्म मतदारास गणना फॉर्म भरून देणे अनिर्वाय आहे. गणना फॉर्म काळजीपुर्वक हताळावे तसेच काळजीपुर्वक भरून बिएलओ यांचे कडे परत करावेत. गणना फॉर्म बिएलओ यांचे कडे परत करण्याची जबाबदारी ही संबंधीत मतदार यांची राहील.
गणना फॉर्म भरून नजीकच्या काळातील पासपोर्ट साईजचा कलर फोटो व पुरावे सोबत देऊन बिएलओ कडे जमा करावेत . जे मतदार नणना फॉर्म भरून देणार नाहीत देणार नाहीत अशा मतदाराची नावे मतदार यादी मधुन वगळली जातील याची नोंद घ्यावी
मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास सर्व मतदार यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन विठ्ठल परळीकर सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार,लोहा यांनी केले आहे. एसआयआर साठी तहसीलदार परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली
नायब तहसीलदार अशोक मोकले, निवडणूक नायब तहसीलदार डॉ संदीप हाडगे, निवडणूक विभाग प्रमुख राजेश गायंगी , महसूल सहायक बालाजी उटलवाड, ईश्वर धुळगंडे, सूर्यकांत पांचाळ, श्री महेंद्र कांबळे व टीम परिश्रम घेत आहे
मतदारांनी द्यायचे पुरावे
———————–
२००२ पूर्वीची मतदार यादी किंवा जुनी निवडणूक पावती, २. जमीन /मालमत्तेची कागदपत्रे किंवा भाडेकरू असल्याच्या नोंदी, ३. नागरिकत्व प्रमाणपत्र, ४. कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
नोंदणी प्रमाणपत्र, ६. पासपोर्ट, ७. एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे, ८. शासनाने दिलेला कोणताही अधिकृत परवाना /प्रमाणपत्र, ९. शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र/दस्तऐवज, १०. बैंक किंवा
शासकीय ओळखपत्र. पोस्ट ऑफिसचे खाते / पासबुक, ११. जन्म प्रमाणपत्र, १२. बोर्ड किंवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र, १३. न्यायालयाच्या नोंदी किंवा कायदेशीर कागदपत्रे, १४. रेशन कार्ड असे पुरावे द्यावे लागतील


