लोहा शहरात लाईट गेल्यास फ्युज काॅलची सोय ; ग्राहकांनी सुविधेचा लाभ घ्यावा — शहर अभियंता स्वामी !
लोहा शहरात लाईट गेल्यास फ्यूज कॉल ची सोय ; ग्राहकांनी सुविधा चा लाभ घ्यावा — शहर अभियंता स्वामी!
——————————————–
उन्हाळ्यात वाढती वीज मागणी आणि वादळी पाऊस विजांचा कडकडाट यामुळे अनेकदा लाईट जाते तसेच अन्य काही कारणाने रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे नागरिकांना उकड्याचा सामना करावा लागतो त्यावर वीज महावितरणने फ्यूज कॉल ची व्यवस्था वीज महावितरण उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता श्री सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली
सायंकाळी चार ते रात्री बारा या काळात स्वतंत्र दोन जनमित्राची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती विद्युत मंडळाचे शहर अभियंता श्री स्वामी यांनी दिली
लोहा शहरातील सर्व वीज ग्राहकांसाठी वीज महावितरण लोहा च्या वतीने अहवान करण्यात आले आहे . आपल्या गल्लीतील किंवा स्वतःचा वीज पुरवठा बंद झाल्यास fuse कॉल नंबर 7875764978 वर संपर्क साधावा.
महावितरण ने गत एक महिन्यापासून 04.00 ते 12.00 पाळीतील fuse कॉल करण्यासाठी दोन स्वतंत्र जनमित्राची नेमणूक केलेली आहे जेणेकरून तात्काळ सेवा देता येईल.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सायंकाळी पाच ते नऊ या कालावधीत भरपूर लोड असतो त्यामुळे गैरसोय होणे साहजिक आहे.
महावितरण कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत तरी सर्व ग्राहकांनी महावितरण ला सहकार्य करावे.उपरोक्त मोबाईल
बिझी असल्यास संदेश टाकावा.
ग्राहकांची संख्या जास्त असल्याने भ्रमणध्वनी बिझी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे अभियंता स्वामी यांनी कळविले आहे

