पुरग्रस्त भागात सर्वतोपरी मदत पुरवा — आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रशासनाला सुचना !
पूरग्रस्त भागात सर्वतोपरी मदत पुरवा– आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना!
——————————————–
नांदेड (रत्नाकर महाबळे)
जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लेंडी धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या भागातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे, तर याचवेळी कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातही अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पूरग्रस्तांना मदत पुरवावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. याच वेळी नागरिकांनीही सतर्क आणि सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन करतो.
नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेले आत्मवृष्ट्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे . गोदावरी, मांजरा, लेंडी, आसना, मन्याड या प्रमुख नद्यांसह उपनद्या आणि नाल्यानाही मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली आली आहेत . मुखेड तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे . लेंडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने या भागामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे . तब्बल 206 मिलिमीटर पावसाची नोंद मुक्रमाबाद परिसरात करण्यात आल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ चे पथक मदतीला धावले असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. काही गावात अडकलेल्या नागरिकांनी पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे . ज्या गावात पशुंची जीवित हानी झाली अशाही गावांमध्ये मदत पोहोचवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. तरीही जिल्हा प्रशासनाने विनाविलंब पूरग्रस्त प्रत्येक गावात मदत पुरवावी. नागरिकांना दिलासा द्यावा . नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत. पुरात अडकलेल्या गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी त्यांचे स्थलांतरण करावे अशा सूचनाही यांनी दिल्या.
दरम्यान माध्यमांशी बोलताना, नागरिकांनी ही पुराच्या पाण्यापासून दक्ष रहावे. आपल्या भागात पूर परिस्थिती निर्माण होत असेल तर तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. स्वतः सुरक्षित स्थळी जात असताना आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी ही सहकार्य करावे आणि स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी ही एक जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेडच्या पूर परिस्थितीवर लक्ष आहे.
नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री #देवेंद्र_फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री #अजितदादा_पवार, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री #एकनाथराव_शिंदे, महसूल मंत्री मा.ना.श्री
#चंद्रशेखर_बावनकुळे, कृषिमंत्री #दत्तात्रय_भरणे हे स्वतः लक्ष देऊन आहेत. मुख्यमंत्र्यांनी या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेतला असून सर्वतोपरी मदतीसाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे ही तातडीने करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घाबरून न जाता धीर धरावा. शासन आणि प्रशासन निश्चितपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वास यावेळी दिला.



