Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

वंचितच्या २३ जून रोजी आयोजित केलेल्या मार्चमध्ये सहभागी व्हावे पदाधिकारी यांचे आवाहन !

वंचितच्या २३ जून रोजी जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे
——————————————–
लोहा (प्रतिनिधी)
लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाच्या अवमानाच्या निषेधार्थ तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक, बौद्ध आणि आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वज सन्मानपूर्वक पुनर्स्थापित करावा, लोहा नगरपरिषद येथील नमुना क्र. ४७ मधील विश्वशांती बुद्ध विहारासाठी नियोजित ९,८४० चौरस फूट जागेची रद्द केलेली मालमत्ता नोंद क्र. २३७२ पुन्हा नोंदविण्यात यावी, विश्वशांती बुद्ध विहार व पंचशील ध्वज उध्वस्त करणाऱ्या भूमाफियांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत, पंचशील ध्वजासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, तसेच गट क्रमांक ११४, जायकवाडी वसाहत येथील जमिनीबाबत नवीन बांधकाम व हस्तांतरण रोखण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
सदर मोर्चाची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा येथून होऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे तहसील कार्यालय, लोहा येथे पोहोचेल. तेथे जाहीर सभा आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता बुद्ध वंदनेने करण्यात येणार आहे.
जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वजाचा झालेला अवमान हा संपूर्ण आंबेडकरी, बौद्ध व बहुजन समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पंचशील ध्वजाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय भिकु संघाचे जिल्हाध्यक्ष भंतेजी पंय्याबोधी थेरो, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भाऊ भोसीकर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, जिल्हा महासचिव रवी पंडित, लोहा नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंचशील कांबळे, ज्येष्ठ नागरिक गंगाधर महाबळे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक गजभारे, जयपाल ढवळे, रंगनाथ गजले, छगन हाटकर, नामदेव बुद्धे व माऊली रायबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्व समाजबांधव, महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button