Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोह्यात वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा !

लोह्यात वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा !
——————————————-लोहा (रत्नाकर महाबळे) लोहा शहरातील जायकवाडी वसाहतीमध्ये पंचशील ध्वज पुन्हा लावण्यात यावा या प्रमुख मागणीसह वंचित बहुजन गाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा हजारो स्त्री पुरुष हातामध्ये पंचशील गंमत्वज व निळे ध्वज घेऊन उपस्थित होते .
नगर परिषदेच्या प्रांगणात असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चाचे नेतृत्व भंन्ते पय्याबोधी यांनी केले. हा मोर्चा भाजी मंडई पोलीस स्टेशन बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला तेथे या मोर्चचे रूपांतर भव्य अशा सभेत करण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . पंधरा दिवसात या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचे अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला या मोर्चात एडवोकेट अविनाश भोसीकर , दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राज आटकोरे, महासचिव रवी पंडित, श्याम कांबळे अक्षय बनसोडे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, संध्या येगंडे, रंगना जंगले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
निवेदना जायकवाडी वसाहतीतील काढलेला पंचशील ध्वज पुन्हा स्थापित करावा. विश्वशांती बुद्ध विहारास 984 चौरस मीटर जागा ही मोजून देण्यात यावी पंधरा दिवसांमध्ये त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिला.
मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, उस्माननगर चे पोलीस उपनिरीक्षक महेश मुळक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button