Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

सरस्वती शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न !

सरस्वती शिक्षक पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा संपन्न
—————————————–

लोहा (रत्नाकर महाबळे )

सरस्वती पगारदार शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना चेअरमन प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांच्या संकल्पनेतून झाली .३२ वी सर्वसाधारण वार्षिक सभा चेअरमन अजय पेठकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण संस्थेचे सचिव नरेंद्र चव्हाण , कार्यालयीन प्रमुख डी एन ठाकूर व संचालक मंडळ उपस्थित होते.

३२ वर्षापूर्वी संस्थापक चेअरमन राजेंद्र भोसीकर, देशमाने, एम.एम. शिंदे, आनेराव, शिंगडेबाई, खदीर महंमद यांनी एकत्रित येवून सरस्वती शिक्षक पगारदार पतसंस्था स्थापन केली. यात कै. नळगे विद्यालय, सुभाषचंद्र बोस विद्यालय पानभोसी, महेश विद्यालय शेवडी बा., शिवछत्रपती विद्यालय लोहा, डॉ. याकुवखान उर्दू शाळा यांचा समावेश आहे. १४२ सभासद आहेत.चेअरमन अजय पेठकर व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, सचिव नरेंद्र चव्हाण कार्यालयान प्रमुख डी-एन .ठाकुर यांनी सांगितले की, पतसंस्थेकडे १ कोटी एक लक्ष रुपयांचे शेअर्स आहेत. ठेवी एक कोटी आठ लक्ष रुपये इतक्या असून स्वतःची जागा तसेच सात लक्ष रुपये इमारत फंड व दोन लक्ष रुपये मुदत ठेवी आहेत .दहा लक्ष रुपया पर्यंत कर्ज मर्यादा आहे यंदा ५२ लक्ष रुपयांचा नफा झाला असून बँक व्याज व गंगाजळी वजा जाता उर्वरित नफ्यातून . ठेवीवर द‌हा टक्के व्याज व ३ टक्के लाभांश वाटपासाठी वार्षिक सभेत मंजुरी देण्यात आली तसेच शिल्लक नफ्यातून मृत्यू पावलेल्या एस. आर. दाढेल ए.डी. जोंधळे, एन. जी. भातमोडे यांच्या कुटुंबीयांना कुटूंबकल्याण अंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्याची मंजुरी देण्यात आली. आपली पतसंस्था जिल्ह्यात अव्वल आहे असे चेअरमन पेठकर व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, यांनी . कार्यालयीन प्रमुख डी.एन. ठाकूर यांनी सांगितले पत्रसंस्थेच्या वर्षभरातील कामकाजाची माहिती दिली- सचिव नरेंद्र चव्हाण यांनी अह‌वाल वाचन केला. वार्षिक
सभेला मुख्याध्यापक दामोधर वडजे, अनिल हामदे, सुलतान शेख, संचालक आर आय भोसीकर महमद फैसल, जे.ई वनजे, हणमंत पवार, टी. एम मेने, सौ .ए.व्ही. पातेवार सौ, आर-यू. भोसीकर, एम आर गोरकट्टे, बालाजी ताबुळे, बी एस पेंडूकर, यासह सभासद उपस्थित होते. सहायक उपनिबंधक , जिल्हा बँके व सहकार्य करणाऱ्याचे कार्यालयीन प्रमुख डी एन ठाकुर यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button