Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

आजोळघर असलेल्या चोंडी गावात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जुन्या आठवणीत रमले !

आजोळघर असलेल्या चोंडी गावात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जुन्या आठवणीत रमले
——————————————
लोहा (रत्नाकर महाबळे)
वडिलांचे आजोळ घर असलेल्या चोंडी ( ता लोहा ) येथे राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली त्याव्ह दगडू जाधव याच्याकडे सत्कार करण्यात आला . वडिलांच्या आजोळी आल्या नंतर जुन्या आठवणी पाहुणे,नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला .विचारपूस केली. राज्याचे सहकार मंत्र्यांचे साधेपणा व सहवास
चोंडीवासीयांना अविस्मरणीय ठरला असं माधव पाटील जाधव डोंगरगावकर यांनी आवर्जून सांगितले
राज्याचे सहकार बाबासाहेब पाटील हे चोंडी ( ता लोहा ) येथे आपल्या वडिलांच्या आजोळात ( ४ मे ) आले होते त दगडू तात्या जाधव (चोंडीकर ) यांच्या घरी स्नेह भोजनझाले …
लिंबोटी धरण ,लिंबोटी धरणापासून होणारे शेतकऱ्यांचा फायदे, ऊस शेती,साखर कारखाना,सहकार, सहकारावर अवलंबून असणाऱ्या शेती विषयी उद्योग, व विविध विषयांवर त्यांनी नातेवाईक पाहुणे ग्रामस्थांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या . डोंगरगाव चोंडी परिसरात बालपणाच्या तसेच
जुन्या नव्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.मंत्री पदाच्या धावपळीतुन वेळ काढत मंत्रीमहोदय बराचवेळ या आडमार्गाच्या खेडेगावात रमले त्याचा सत्कार व पाहुचार मोठ्या आनंदाने करण्यात आला
माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हाद पाटील फाजगे, युवा कार्यकर्ते माधव पाटील डोंगरगावकर सरपंच प्रदीप फाजगे , कुशब तात्या जाधव, महेशराव देवने, तलाठी जाधव साहेब, यासह ग्रामस्थ उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button