Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

शहरात ऑक्सिजन देणारे झाडे लावावे ; विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही — आ. प्रतापराव पाटील चिखलीकर !

शहरात ऑक्सिजन देणारे झाडे लावावे ; विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर !
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा शहरात सर्वांनी आॅक्सीजन देणारे झाडे लावावे व लोहा न.प.ने चांगले काम करावे शहराला जेवढा निधी लागेल तेवढा निधी देऊ विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन लोहा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा येथे दि.१८ जून २०२६ रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा नगर परिषदेच्या वतीने आयोजित भव्य वृक्ष वृक्षारोपण कार्यक्रमांत केले.
लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर बस स्थानकासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा नगर परिषदेच्या वतीने भव्य वृक्ष लागवड कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमांचे उद्घाटक लोहा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते तर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी लोहा न.प.चे माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार होते तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, युवानेते सचिन पाटील चिखलीकर,लोहा न.प. चे नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपाध्यक्ष करीम शेख मुजावर, लोहा पं. स.चे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे,लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष दता भाऊ वाले, लोहा पं.स. चे माजी सभापती खुशालराव पाटील , कंधार न.प. चे उपाध्यक्ष मन्नान चौधरी,लोहा न.प.चे गटनेते भास्करराव पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल,नगरसेवक हरीभाऊ चव्हाण, श्याम अण्णा पवार, शंकर वट्टमवार, केतन खिल्लारे,सदा तेलंग, राजेश बोडके, इरबा पवार, रावसाहेब मंजलवाड, सतीश निखाते, तुकाराम दाढेल, नारायण येलरवाड, माजी स्वच्छता सभापती बाबुराव डोम, माजी नगरसेवक रमेश माळी, शिवाजी आंबेकर, ल़ोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अंकुशराव पाटील कदम,लांडगेवाडीचे सरपंच बाळासाहेब टोपारे,धावरीचे माजी सरपंच अभंग पाटील गाडेकर, मारोती ऐजगे,भूषण दमकोंडवार, नामदेव पवार, शेलगावचे सरपंच मारोती पाटील कदम, रज्जाक शेख, राहुल पाटील बोरगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी लोहा बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या दुभाजका मध्ये आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाला दुर्दैवाने जयंती म्हणावी लागेल. स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात सर्व प्रथम लोहा न.प.ने वृक्ष लागवड करण्याचे हाती घेतले आहे. स्व.अजित दादा ची पहिली आवड वृक्ष लागवड करण्याची होती. बारामती शहर हे भारतात सर्वात हिरवेगार शहर आहे तसेच आपल्याला लोहा शहर करायचे आहे. लोहा न.प. ,संत फाऊंडेशन व सामाजिक वनीकरण या तिघांच्या माध्यमातून हे वृक्षारोपण होत आहे.नुसते वृक्षारोपण करुन चालणार नाही तर आपल्याला झाडे जगवावे लागतील. आपण स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा शहरात १ लाख ५१ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जून च्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे खड्डे करण्याचे काम चालू आहे. नगराध्यक्ष शरद पवार यांची टीम चांगले काम करीत आहे. येणाऱ्या काळात हरित लोहा म्हणून ओळखले जाईल.
कोरोनाच्या काळात माणसाला आॅक्सीजन मिळत नव्हता.भविष्यात आपल्याला आॅक्सीजन ही मिळणार नाही त्यासाठी झाडे लावा.‌गेल्यावर्षी आम्ही नागबर्डी देवस्थानला १० हजार झाडे लावली होती तिथे ७ हजार झाडे जगली व तेथील वातावरण बघून जास्तीत जास्त लिंबाचे झाडे लावली होती.लिंबाच्या पानाला कुणी हात लावेना. माझी सर्वांना विनंती आहे . आॅक्सीजन देणारे झाडे लावा व लोहा न.प. ने मागेल त्याला झाड लावण्याची योजना सुरू करावी.
नगराध्यक्ष शरद पवार यांच्या या टीमच्या काळातच लोहा शहर हरित करुया यासाठी त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी केले तर सुत्रसंचलन बी.डी. जाधव सर यांनी केले व आभार गटनेते भास्करराव पाटील पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button