Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

जिल्हा रुग्णालयात रुग्ण समितीच्या सदस्स पदी मारोती पाटील बोरगांवकर यांची नियुक्ती !

जिल्हा उपरुग्णालय “रुग्ण समितीच्या सदस्य पदी मारुती पाटील बोरगावकर याची नियुक्ती !
—————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या वतीने रुग्ण समिती सदस्य म्हणून कृउबा समितीचे उपसभापती मारुती पाटील बोरगावकर याची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रभारी रुग्णालय अधीक्षक डॉ प्रशांत जाधव यांनी स्वागत केले

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हा उप रुग्णालयाची रुग्ण समितीचे पुनर्गठन केले आहे.रुग्ण सेवेत निरपेक्ष भावनेने गेल्या अनेक वर्षां पासून मारुती पाटील बोरगावकर यांनी रुग्ण सेवेला वाहून घेतले आहे.ता भागातील कोणीही त्यांना आजारी रुग्णा बाबत सांगितले तर ते स्वखर्चाने रुग्ण नातेवाईका सोबत मुंबई पुणे नांदेड हैदराबाद, बार्शी , छत्रपती संभाजीनगर या शहरात रुग्णा सोबत जातात. त्याचा रुग्ण व रुग्ण नातेवाईक याना सहकार्य करतात .त्याचे या क्षेत्रात मोठे काम आहे
आ.चिखलीकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण समिती पदी माजी सरपंच मारुती पाटील बोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्ती बद्दल आ प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील, माणिकराव मुकदम, प्राणिताताई देवरे चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, ऍड मुक्तेश्वर धोंडगे, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , प्रा डॉ डी एम पवार, छत्रपती धुतमल ,हरिभाऊ चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, दिनेश तेललवार,प्रा.डॉ टी एम,शिंदे, , श्याम पाटील, खुशाल पाटील पांगरिकर, बाबाराव पाटील गवते, करीम शेख, बी डी जाधव यासह मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे. त्याच्या निवडीच रुग्णाना मोठा फायदा होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button