Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहा तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा आरक्षणासाठी भव्य मोर्चा !

लोहा तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा आरक्षणासाठी भव्य मोर्चा !
——————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे ) बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज मंगळवार रोजी लोहा तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा पारंपारिक वेशभूषेत बंजारा महिला , पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
राज्य शासनाकडून 2 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले मराठा कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे असे जाहीर केले. याच गॅजेटीयर नुसार बंजारा समाजाच्या देखील नोंदी सुकडी म्हणून सापडत आहेत आणि ही जात एसटी प्रवर्गात येते त्यासाठी आम्हाला देखील ते आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता
मोर्चाची सुरुवात शनिदेव मंदिर पासून करण्यात आली आणि तहसील कार्यालयात पर्यत मोर्चा आल्यानंतर बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले नंतर भव्य अशा सभेमध्ये मोर्चाचे रूपांतर झाले यावेळी बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष देविदास राठोड डॉ बी डी चव्हाण , भगवान राठोड, संजय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सामील पारंपारिक वाद्य वाजवत सर्वांचे लक्ष या मोर्चाकडे वेधून घेतले त्यात मोठ्या प्रमाणात तरुणांनी हातामध्ये पांढरे ध्वज आणि महापुरुषांच्या फोटो घेऊन मोर्चात सहभागी झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button