Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

निवडणूक आयोगाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे — जिल्हाधिकारी अभिजीत राऊत !

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
——————————————
लोहा(रत्नाकर महाबळे)
विधानसभा निवडणुक प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण करावे मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात यासह महत्वाच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्षेत्रीय व नोडल अधिकारी यांच्या बैठकीत दिल्या
लोहा विधानसभा मतदार संघातील नोडल व क्षेत्रीय ऑफिसर याची बैठक तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
याच्या उपस्थितीत। पार पडली लोहा विधानसभा क्षेत्राचा प्राशकीय पातळीवरील तयारीचा आढावा घेतला निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार ,सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे,निवडणूक नायब तहसीलदार हाडगे,कंधारच्या नायब तहसीलदार रेखा चामणार, निवडणूक समन्वयक थोटे, धुळगंडे, महसूल सहायक तिरुपती मुंगरे ,गायंगे, सूर्यकांत पांचाळ,दयानंद मळगे, यासह कर्मचारी उपस्थित होते
जिल्हाधिकारी यांनी उपस्थिती ४२ क्षेत्रिय अधिकारी, १५ नोडल अधिकारी, व प्राशकीय पातळीवर निवडणूकिसाठी नियुक्त केलेल्या पथक प्रमुखांशी संवाद साधला.निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या आहेत त्या फालो कराव्यात.,विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने निर्देशित केल्या नुसार भौतिक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व घटकांनी मतदान प्रकियेची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी ईव्हीएम, कमिशनिंग, होम व्होटिंग याची प्रकिया व्यवस्थित व्हावी यासह इतर सूचना जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी बैठकीत दिल्या.
सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी लोहा तहसील कार्यालयात बैठकीसाठी आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रशासकीय पातळीवर निवडणूक विषयक कामकाजाची व नियुक्त पथकाची माहिती दिली.ईव्हीएम मशीन ,स्ट्रॉंग रूम, आवेदन दाखल करण्यासाठीचे कक्ष याची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.तहसीलदार परळीकर तहसीलदार गोरे यांनी माहिती दिली.जिल्हाधिकारी यांनी टीम अरुणा संगेवार याच्या कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले

निवडणूक फॉर्म भरताना पाच जणांना प्रवेश
—————————————

निवडणूक फर्म भरताना ताफ्यातील तीन वाहन असावेत त्याचे रितशीर परवानगी निवडणूक कक्षेकडून घ्यावी लागणार आहे.तसेच अर्ज देताना उमेदवारासह पाच जणांना निवडणूक अर्ज स्वीकार कक्षेत प्रवेश मिळणार आहे.तसेच कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात राजकीय पक्ष व उमेदवार याना कोणतीही सभा ,बैठक घेता येणार नाही याची असे निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी।सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button