वंचित चे उमेदवार शिवा नरंगले यांच्या मदतीला जनता धावली ; अन् ५ लाख ५५ हजारांची लोकवर्गणी झाली !

–
वंचित “उमेदवार नरंगले यांच्या मदतीला जनता धावली ; अन ५ लाख ५५ हजाराची लोकवर्गणी झाली
——–– ———————————
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा मतदार संघात अमाप व गडगंज संपत्तीच्या बळावर वाट्टेल तेवढे पैसे मतदारांना कार्यकर्त्याना देऊन निवडणूक जिंकू अशी अतिमहत्वकांक्षा बाळगणारे उमेदवार इच्छुक आहेत.त्याच मतदार संघात आपल्या घामाच्या . कष्टाचा एक एक पैका (पैसा) सत्कारणी लागावा या हेतूने मतदार पुढे येत आहेत.वंचित आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले याच्या मदतीला जनता धावली व ५ लक्ष ५५हजार रुपयांची लोकवर्गणी एकाच तासात जमा झाली.” प्रचंड धनाचा” दर्प “असणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध हे झणझणीत अंजन होय.जेथे पैसा शिवाय निवडणूक नाही असे वातावरण असतानाच माजी सरपंच जालिंदर कागणे, प्रहार चे माऊली गीते,संतोष केंद्रे, ओम साखरे, सचिन बल्लूरे , ऋतुक जोंधळे, यांनी घेतलेला पुढाकार हे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला “बळ “देणारे होय
लोहा विधानसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण अडीच महिन्यापूर्वी तयार झाले त्याची मुहूर्त माळाकोळी गावाने रोवली.माळेगाव यात्रा येथे लोहा कंधार तालुक्यातील ओबीसी नेत्यांची बैठक झाली. सर्कल निहाय बैठका ठरल्या. त्यात एक उमेदवार देण्याचे ठरले.पुढे ( आता इच्छुक स्वतःचेच पाहत आहेत)
वंचित आघाडीचे संस्थापक ऍड प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव रॅली लातूर मार्गे नांदेड जिल्ह्यात आली .त्या रॅलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य व आ श्यामसुंदर शिंदे यांचे एकनिष्ठ पदाधिकारी चंद्रसेन पाटील यांनी आयोजन केले.शक्ती प्रफर्शन केले मोठी गर्दी झाली लोह्यात जंगी स्वागत झाले. चंद्रसेन पाटील , प्राचार्य संजय पवार, माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व शिवा नरंगले याचे एकत्रित बॅनर त्या दौऱ्यात झळकले.उमेदवारी चंद्रसेन पाटील यांना मिळणार(?) असे वातावरण तयार झाले.शिवाय लोह्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यवंशी, प्राचार्य पवार यांनी फिल्डिंग लावली पण शिवा नरंगले “वरचढ ठरले. त्यानंतर तिघांनी प्रमुख राजकीय पक्ष व नेते यांच्याकडे उमेदवारी मागणीची केली.यातील एका युवा नेत्याने फिरून फिरून अखेर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण याचे शिवाजीनगरचे निवासस्थान गाठले. आता कोणत्या पक्षात आहेत (?) असा प्रश्न माजी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला ह आता तर माजी खासदार व शिवसेना
उपनेत्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडे चाचपणी सुरू केली पण तेथेही उपजिल्हाप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू बाळासाहेब कऱ्हाळे वरचढ ठरताना दिसत आहेत. असा हा सगळा घटनाक्रम एकीकडे तर दुसरीकडे वंचित कडून उमेदवारी शिवा नरंगले याना जाहीर झाली त्या नंतर इच्छुक उमेदवार चंद्रसेन पाटील यांनी सोशल मीडियात आपण निवडणूक लाढविणार असे जाहीर केले. कार्यकर्त्यांला वाऱ्यावर सोडणार नाही असे स्पष्ट केले.. शिवा नरंगले ऐवजी आपणास उमेदवारी मिळते काय (?) यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच राहिले. लोहा विधानसभेतील वंचितचा उमेदवार बदलावा याची मागणी पूढे आली भेटीगाठी घेतल्या .पण अजून तरी यश आलेले दिसत नाही(?) श्याम कांबळे व पक्षातील जुने सहकारी शिवा सोबत खंबीरपणे उभे राहिले हे विशेष..
आ श्यामसुंदर शिंदे याना माजी जि प सदस्य चंद्रसेन पाटील सोडून जाण्याचा मोठा फटका बसणार आहे.चंद्रसेन पाटील यांनी तसे संघटन उभे केले असून ओबीसी मधील युवक व आंबेडकरी चळवळीतील तरुणांची फळी त्याच्याकडे आहे.शिवाय मतदार संघात नेटवर्क वाढविले आहे
.वंचित ” उमेदवार शिवा नरंगले याच्या उमेदवरीवार फेरविचार करावा असे ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे मागणी माळाकोळी गावतून करण्यात आली त्याच गावाने लोकवर्गणी केली.त्यामुळे उमेदवार शिवा नरंगले भारावून गेले माळाकोळी गावाचे माजी सरपंच जालिंदर कागणे संतोष केंद्रे, ओम साखरे, माऊली गीते सचिन बल्लूरे , ऋतुक जोंधळे, यांनी पुढाकार घेतला व एकाच दिवसात ५ लाख ५५ हजार रुपयांची लोकवर्गणी करून दिली.
जेथे पैसे दिले की मतदान देतात असा समज करून घेत गडगंज व अमाप पैशाच्या बळावर निवडणूक जिकू पाहणाऱ्या साठी हे झणझणीत अंजन होय.लोकांनी जमेल तशी वर्गणी करून दिली.. आगामी काळातही 25 लक्ष रुपये देण्याचा संकल्प करण्यात आला.निवडणूकीपूर्वीच फुलांचा नव्हे तर पैशाचे “हार”,शिवा नरंगले याच्या गळ्यात घालण्यात आले.हे पाहून उमेदवाराचे डोळे पाणावले.


