Uncategorizedनांदेडमुख्य बातमी

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष -पण लोहा पोलीस दक्ष दारुवर छापे 3 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त !

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष — पण लोहा पोलिस दक्ष ; दारूवर छापे 3 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त.
———————————————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे )
लोहा शहर व परिसरात देशी दारू दुकानदार व वाईन मार्ट हे लगतच्या गावात दारू वाहतूक करत सर्रास विक्री करतात त्यांना कोणतीही आठकाठी नसते.त्यामुळे गावोगावी जागोजागी अवैध दारू मिळते .पण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी चौफेर धाडसी मोहिम सुरू केल्या आहेत. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन ठिकाणी लोहा पोलिसांनी छापेमारी केली यात पोलिसांनी 3 लाख 53 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व दोन गुन्हे दाखल केले त्यामुळे चोरून दारू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत

काल ही लोहा पोलिसांनी तीन ठिकाणी अवैध दारू अड्यावर छापे मारून हजारोचा मुद्देमाल जप्त केला होता. दोन दिवसापूर्वी अवैध जुगारावर छापेमारी करून हजारोचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले होते.
पोलीस निरीक्षक चिंचोलकर हे रुजू झाल्या नंतर अवैध धंदे वाल्या वर कडक कारवाई सुरू केली आहे. अवैध धंदेवाल्याचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. अनेक धंदेवाल्यांनी आपले धंदे बंद करून गाशा गुंडाळला आहे. नागरिकांत श्री चिंचोळकर यांच्या मोहिमेचे जोरदार स्वागत होत आहे दसऱ्याच्या पूर्व संध्येला दोन ठिकाणी अवैध दारू वाहनातून घेऊन जाणाऱ्या ठिकाणी छापे मारी केली आणि ३ लक्ष ५३ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी दारू वरील कार्यवाही मानली जाते जी कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने करायला पाहिजे तसे होत नाही ठराविक हप्त्यात मश्गुल असलेल्या या विभागाच्या दुर्लक्षामुळे दारू खुलेआम मिळते पण पोलिस दक्ष झाले आणि त्यांनी कार्यवाही केली ही कारवाई पोनि चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शना पीएसआय नाईक, रवी मडके, दीपक गुट्टे,यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button