Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहा तालुक्यातील 45 गावात राजकीय पक्ष नेत्यांना गावं बंदी

लोहा तालुक्यात ४५ गावात राजकीय पक्ष नेत्यांना “गावबंदी ” मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्र
———————————-

लोहा (रत्नाकर महाबळे)

चुलीत गेले नेते.. चुलीत गेले पक्ष… मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष……. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत कोणत्याही पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही असे गावाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून ग्रामस्थांनी प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे.लोहा तालुक्यात जवळपास ४५ हुन गावात नेत्यांना गावबंदी केली आहे.मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे असे आंदोलक तरुणांनी सांगितले .
मराठा आंदोलनाची तीव्रता आता अधिक अधिक वाढत आहे .मनोज पाटील जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण अंतरवेळी सराटी येथे सुरू केले आहे.मराठा तरुणांनी आरक्षणा बाबत एकजूट दाखवत गावोगावी राजकीय पक्षनेत्यांना गाव बंदी करण्यासाठी पुढे येत आहेत सर्व पक्षीय नेते मंडळीचा आरक्षणासाठी पाठींबा मिळतो आहे.
लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू असून ४२ व्या दिवशी हे उपोषण सुरूच आहे.गावनिहाय ठरवून दिले आहे.मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली आहे लोहा ता…
तालुक्यातील सायाळ, भद्रा, पांगरी भारसावडा,पेनुर,धावरी, मस्की,पोखरभोसी,पार्डी, जनापुरी,सोनखेड,बेट सांगवी,आडगाव,
,बेनाल,बेटसंगवी,डेरला,कलंबर,शिवणी,कापशी,मजरेसंगवी,,डोंगरगाव,मस्की, जोशिसांगवी,येळी,सुगाव,लोंढेसांगवी, हरसद, पळशी,भेंडेगाव, पारडी,धानोरा यासह जवळपास ४५ हुन अधिक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे ही संख्या दिवसा गणिक वाढते आहे असे सामाजिक संघटनेचे प्रमुख माऊली पाटील पवार सायाळकर यांनी सांगितले
आंदोलन शांततेत सुरू आहे.आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना ट्रोल केले जात आहे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बाबत मराठा तरुणांच्या भावना तीव्र आहेत त्याचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जातोय मराठा तरुणांची अभूतपूर्व एकजूट आंदोलनाची मोठी शक्ती होय त्यामुळे राजकीय नेत्यांच्या दौरे ,समारंभ थांबले आहेत त्यांना जागोजागी तरुणांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे शहरातील उपोषण स्थळी गावनिहाय आंदोलन शांततेत सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button