लोहा तालुक्यातील कोष्टवाडी गावात बाळूमामा सप्ताहाचा प्रसादातून हजारो भाविकांना विषबाधा !

लोहा तालुक्यातील कोष्टवाडी गावात बाळूमामा सप्ताहाचा प्रसादातून हजारो भाविकांनी विषबाधा !
————————————————————————————–
लोहा रत्नाकर महाबळे
भगर वआमटीच्या महाप्रसादातून दीड ते २ हजार भक्तांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना लोहा तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत कोष्टवाडी गावात घडली आहे. विषबाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात , अहमदपूर, माळाकोळी, कंधार,पालम नांदेड येथील शासकीय व खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहेत. रात्री उशिरा झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. सर्वच रुग्णांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत
लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे दोन दिवसांपासून संत बाळू मामा यांचा सप्ताह सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. काल एकादशीनिमित्त दर्शनसाठी मोठी गर्दी झाली होती एकादशीनिमित्ताने भगर व आमटीचा महाप्रसाद होता. आणि तो महाप्रसाद खाल्त्याने अनेक जणांना रात्री उशिरा विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधा झालेल्याना मळमळ,उलट्या त्रास होऊ लागल्याने अनेक जण मिळेल त्या वाहनाने लोहा येथील शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले
परंतू रुग्णांची संख्यावाढत असल्याने अहमदपूर, नांदेड , माळाकोळी पालम, कंधार येथील शासकीय रुग्णालयात देखील रूग्णांना उपचाराठी भरती करण्यात आले आहे.त्यामुळे रूग्णालयात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. रुग्णांमध्ये सावरगाव, कोष्ठवाडी, हरणवाडी, रिसनगाव, पेंडू, मुरंबी आदी गावातील भाविकांचा समावेश आहे. सध्या विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ अब्दुल बारी, डॉ हर्षवर्धन सोनकांबळे, डॉ दिपक मोटे, डॉ जाधव, डॉ शितल पानझडे, डॉ कुलदीप, यांनी रुग्णावर उपचार केले तर रुग्णवाहिकेचे चालक सिद्धार्थ ससाने यांनी रुग्णांना नांदेड येथे हलवण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार अशोक मोकले लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले ,काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार ,खाजगी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल धुतमल यांनी घटनास्थळी जाऊन रुग्णांना मदत केली रुग्ण येण्याची संख्या एवढी मोठी होती की उपजिल्हा रुग्णालयात या रुग्णांना अक्षरशः जमिनीवर उपचार घ्यावे लागले या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी रूग्णालयात भेट दिली आणि तात्काळ जिल्ह्यावरून औषध पुरवठा उपलब्ध करून दिला. सकाळी घटनास्थळी तहसीलदार शंकर लाड ,गटविकास अधिकारी डी के आडेराघो, विस्तार अधिकारी गायकवाड, प्रशासनिक अधिकारी प्रियदर्शन वाघमारे, माळाकोळीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, अन्न औषध अधिकारी यांनी भेट देऊन तेथील नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून अनेक रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
हजारो लोकांना विषबाधा आणि लोहा पोलिसांची सतर्कता
—————————————————————————————
पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना घटनेची माहिती समजतात त्यांनी संपूर्ण यंत्रणाच जागी केली, त्यांनी बाधित गावामध्ये लोहा शहरातील खाजगी वाहने पाठवण्याचे काम केले खाजगी वाहतूक मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल धुतमल यांच्याशी संपर्क साधून त्यांनी या सर्व खाजगी वाहतूकदारांना बोलावून बाधित गावांमध्ये वाहने पाठवली आणि त्या वाहनांमध्ये रुग्णांना लोह्यात व नांदेड पालम अहमदपूर कंधार माळाकोळी या ठिकाणी पाठवण्यात आल. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांना संपर्क केला आणि निमशासकीय रुग्णालयात डॉक्टर यांना देखील आपले दवाखान्यात येण्यास सांगितले रुग्ण संख्या मोठी असल्याने डॉक्टरांना ते आवरणे शक्य झाले नसल्याने स्वतः पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचाळकर आणि त्यांच्या टीमने स्वतः बेड साफ करून रुग्णांना उपचारासाठी खुले करून दिले डॉक्टरांनी नातेवाईक यांच्यात वाद होऊ नये यासाठी त्यांनी रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबून केवळ एकच नातेवाईक सोबत राहण्याची परवानगी दिली एकाच वेळी हजारो रुग्ण दाखल झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आणि प्रत्येकासाठी सलाईन ही आवश्यक असल्याने स्वतः पोलीस निरीक्षक चिंचोळकर आणि त्यांच्या टीमने रुग्णांसाठी हातात सलाईन घेऊन उभे होते.ऐरवी शिस्त लावण्यासाठी हातात काठी घेऊन आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी देखील प्रसंगावधान ओळखून हातामध्ये मुलांच्या बाटल्या घेऊन रुग्णांचे जीव वाचवले यामुळे सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

