लोहा — कंधार मध्ये १९८५ नंतर विधानसभेत यश मिळाले नाही — काॅग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार ईश्वरराव भोसीकर !

लोहा -कंधार मध्ये १९८५ नंतर विधानसभेत यश मिळाले नाही- काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आ भोसीकर यांची खंत
————————-
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा कंधार तालुक्यातील काँगेस पक्षाचे एकमेव आमदार झालेले पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या नंतर ३५ वर्षात या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा आमदार होऊ शकला नाही..वयाच्या ८९ व्या वर्षात पदार्पण केले श्री भोसीकर यांनी पक्ष मोठ्या ताकदीने उभा करता आला नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली .ठणठणीत प्रकृती स्वास्थ्य असलेले माजी आमदार हे आजही खादी ग्रामोद्योग समितीवर सक्रिय आहेत.पण सध्या पक्षाची जी दैन्यवावस्था आहे त्यावर अतिशय मार्मिकपणे त्यांनी टिप्पणी केली.पक्ष का वाढत नाही(?) त्याची करणे अधोरेखित करताना त्यांनी चिंतनाची गरज असल्याचे स्पष्टपणे सांगितले
कंधार ( आताचा कंधार ) विधानसभा मतदारसंघात द्विभाषिक राज्य असताना १९५२ मध्ये पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ऍड गोविंदराव मोरे टेळकीकर हे विजयी झाले होते त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पदश्री श्यामराव कदम यांच्या पराभव केला .त्यानंतर या मतदार संघात भाई केशवराव धोंडगे यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले.१९५७, त्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्मिती च्या पहिल्या निवडणुकीत १९६२ ,मध्ये सलग दुसऱ्यांदा निवडून आले.१९६७, १९७२, १९८५, १९९० असा पंचवार्षिक काळात भाई धोंडगे आमदार होते ते १९७७मध्ये भाई गुरूनाथराव कुरुडे यांनी विजय मिळविला.
साठ-सतरच्या दशकात काँग्रेस नेते डॉ शंकरराव चव्हाण यांच्या सोबत शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर ,माजी आ ईश्वरराव भोसीकर, , शिवराम पवार, शिवाजीराव बोधगिरे, माणिकराव पाटील, विठ्ठठलराव पवार, माजी सभापती व्यंकटराव मुकदम, मंगनाळे, गिरे, तेलंग, केंद्रे, अशी त्याकाळात मातब्बर नेते मंडळी होती.ऍड भोसीकर याना १९६६-७२ या काळात विधानपरिषदेवर घेण्यात आले.ते पक्षाचे प्रमुख नेते होते .जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पक्ष वाढी सोबतच त्यांनी विधायक विकास कामे केली.१९८० मध्ये कंधार विधानसभा मतदारसंघात पाहिले काँग्रेस आमदार म्हणून ते निवडून गेले.त्याच्याच काळात लिंबोटी धरणाची पायाभरणी झाली.प्रतापरावांच्या काळात धरण पूर्णत्वास गेले सोनखेड येथील इंदिरा घरकुल , लोह्यातील इंदिरा नगर त्यांच्या काळात उभे राहिले .१९८०ते ८५ या काळात ते आमदार होते पण
१९८५ नंतरच्या या मतदारसंघात एकदाही काँग्रेस जिकली नाही.१९९९मध्ये स्वतः भोसीकर हेच अल्पसा मतांनी हरले.पण त्याच्या नंतरच्या काळात काँग्रेस मध्ये प्रभावी खंबीर नेतृत्व उभे राहिले नाही आणि पक्ष नेतृत्वाने तसे उभे करण्याचा प्रयत्न केला नाही न .अलीकडच्या २००४ नंतर च्या निवडणुकीत तर पक्ष नेतृत्वाने सोयीप्रमाणे इतर पक्षाला पाठींबा दिला.इतकेच नाही तर २००९च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात “कमळ” गावोगावी फुलले.कधी घड्याळ कधी, धनुष्यबाण आता तर कट्टर विरोधक असलेल्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याशी युती असा दोलनामय राजकीय स्थिती या दोन्ही तालुक्यातील काँग्रेस हेलकावे घेत आहे .प्रतापराव पाटील यांना विरोध एवढयासाठीच सगळी ताकद केंद्रित केली जाते .पण त्यांनी गावोगावी कार्यकर्ता जोडला तर काँग्रेस एकमेकांना ओढण्यात खर्ची पडली.
अनेकांनी पक्ष बद्दल एवढेच काय तर खुद्द भाई केशवराव धोंडगे यांच्या कुटुंबात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्षांतर झाले तेथे त्याचेच पारंपरिक विरोधक ऍड ईश्वरराव भोसीकर यांनी काँग्रेस सोडली नाही आणि त्याच्या चिरंजीवांनी सुद्धा पक्षाचा झेंडा कायम खांद्यावर घेतला.तरीही त्याच्या बाबतीत पक्ष नेतृत्व अविश्वास व्यक्त करतात . होकायंत्राच्या संशयाची सुई नेहमी भोसीकर कुटुंबियांवरच असते.
त्याचे या कुटुंबाला नेहमीच खंत वाटते.तशी ते उजागर बोलून दाखवितात.हरिहरराव भोसीकर याना संधी न्याय तर थोरल्या सीकरांवर अन्याय असेच राजकीय चित्र असते
माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या जेष्ठतेचा व पक्ष निष्ठतेचा आदर ज्या पद्धतीने पक्ष पातळीवर व्हायला पाहिजे ते अलीकडच्या दोन दशकात झाला नाही तरीही ना त्रागा..नाही आदळ आपट त्यांनी केली .देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिराजी याच्याशी माजी आ भोसीकर यांची ओळख होती.माजी मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण, डॉ शंकरराव चव्हाण सुधाकरराव नाईक, शरदचंद्र पवार, वसंतदादा पाटील, बँ.ए आर अंतुले, शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख , अशोकराव चव्हाण , यांच्याकार्यकाळ त्यांनी अनुभवला.देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशी त्याची घनिष्ठता राहिली आहे
पण आज लोहा कंधार मतदार संघात पक्षाची जी वाताहत झाली त्यावर साठच्या दशका पासून सक्रिय राजकारणात त्यामुळे प्रदीर्घ अनुभव आहे .चढउतार पहिला त्यावर बोलताना त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यात एकेकाळी भक्कमपणे उभा असलेला काँग्रेस पक्ष आता ठराविक भागा प्रबळ राहिला आहे .या दोन्ही तालुक्यात काँग्रेस पक्ष जोमाने उभे करणारे नेतृत्व या भागात तयार होऊ शकले नाही याची खंत त्यांनी ८९ व्या वर्षांत पदार्पण करताना व्यक्त केली.



