Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

उघड्यावर मांस विक्री, कचरा टाकणाऱ्या विरूद्ध लोहा पोलीसांची विशेष मोहीम ; 122 जणांवर कारवाई !

उघड्यावर मांस विक्री , कचरा टाकणाऱ्या विरुद्ध लोहा पोलिसांची विशेष मोहीम : 122 जणांवर कार्यवाही
——————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे )
वाट्टेल तेथे मटणाची दुकाने, रस्त्यावर दुकानातील समान ठेवणे, कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन , विना नंबर दुचाकी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट व वाहतूक नियमांचे पालन न करणे असा वेगवेगळ्या घटनेच्या अंतर्गत लोहा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीमने धडक मोहीम सुरू केली त्यात १२२जणाविरुद्ध कार्यवाही केली आहे

लोहा शहरात नियमाची पायमल्ली सर्रास होत असते पण दोन महिन्या पूर्वी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी पदभार स्वीकारला आणि सर्वसामान्य माणसाला ते “सिंघम” झाले आहेत .शहरातील वर्षानुवर्षे गुदमरलेले रस्ते आता मोकळा श्वास घेत आहेत.
पोलिसांनी शहरांमध्ये विशेष मोहीम राबविले आहे रोडवर दुकाने लावने, हात गाडी लावणे, दुकानाचे सामान लावणे, दुकानासमोर रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास व्यक्तीस अडथळा होईल त्रास होईल अशा पद्धतीने कृत्य केलेल्या 13 जणांविरुद्ध भारतीय दंडविधान 283 प्रमाणे 13 गुन्हे दाखल करण्यात आले
आपल्या दुकानातील सामान रोडवर ठेवले व लोकांना अडचण केली असा सहा दुकानदारा विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1949 कलम 102, व 117 प्रमाणे 6 केसेस खटले दाखल केले आहेत .
सार्वजनिक ठिकाणी रोडवर आपल्या दुकानाचा कचरा टाकून शहरात रोडवर घाण केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1949 कलम 115व ,117 प्रमाणे एका दुकानदारा विरुद्ध कारवाई केली नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त इतरत्र कोणत्याही ठिकाणी मांस विक्री दुकान लावणे ते उघड्यावर दिसेल अशा पद्धतीत विकणे ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त विकणे या विरोधात पोलिसांनी कार्यवाहीचा बडगा उगारला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 105,आणि 117 प्रमाणे मोंढ्यातील तिघां जणां विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल कलम 110,112,117 प्रमाणे 3 लोकांवर केसेस दाखल करण्यात आले. विना नंबर शहरांमध्ये वाहने चालवणाऱ्या बारा गाड्या पोलिसांनी आज जप्त केल्या आहेत. वाहतुकीचे नियम मोडणारे कागदपत्रे न बाळगणारे रोडवर अस्ताव्यस्त गाडी लावणारे असा 84 वाहनधारकावर कारवाई करण्यात आल्या आहेत.त्यांच्याकडून ५६ हजार ७०० रुपयांचा दंड करण्यात आला. सामाजिक सार्वजनिक सुरक्षितता स्वच्छता अंतर्गत १२२ कारवाई करण्यात आली.पोलीस निरीक्षक चिंचोलकर व टीमने केलेल्या कार्यवाईचे व .उघड्यावर मांस विक्रीला प्रतिबंध केल्या मुळे शाकाहारी नागरिकांनी स्वागत केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button