Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

खंजर घेऊन फिरणाऱ्या तरुणासह तिघांना लोहा पोलिसांनी केले जेरबंद !

खंजर घेऊन फिरणाऱ्या तरुणांसह तिघांना लोहा पोलिसांनी केले जेरबंद.
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे )
लोहा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ओमकांत
चिंचोलकर रुजू झाल्या नंतर शहरातील वाहतूकीला शिस्त लावली .गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सुरू केले असून तहसील कार्यालयाच्या परिसरात खंजर घेऊन फिरणाऱ्या व गाड्या आडव्या लावून येणाऱ्या जाणाऱ्यावर दहशद निर्माण करणाऱ्या तीन तरुणां विरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका तरुणास अटक करण्यात आली.या कार्यवाहीत दोन पोलिसांना जखमी झाली आहेत .ही घटना शुक्रवारी रात्री घडली
कारवाही दरम्यान दोन पोलिस झाले जखमी.
शस्त्र अधिनियम कलम 4 (25) प्रमाणे तीन आरोपीवर लोहा पोलिसात गुन्हे दाखल.
लोहा कंधार रोडवर शुक्रवारी रात्री तहसील समोर तीन तरुण मोठा खंजर घेऊन रोडवर फिरत होते गाड्या अडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरवीत होते.
ही माहिती लोहा पोलिसांना मिळतात तात्काळ लोहा पोलिस चे पोलीस नाईक माधव डफडे, पोलिस अंमलदार नामदेव ईजुलकंठे, वामन राठोड हे घटनास्थळी पोहोचले. युवक शिवम हा एका फुटापेक्षा मोठा धारदार चाकू हातामध्ये घेऊन फिरवत होता.पोलिसांनी हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या व दहशत मजवीणाऱ्या आरोपीस अतिशय सीताफिने पाठलाग करून पकडले व अटक केली.आरोपी च्या हातातील खंजर पोलिसांनी जप्त केला.
इतर दोन जण वीरेंद्र राजेंद्र नरंगले व सुमित वाघमारे हे घटनास्थळावरून पळून गेले
पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या कारवाईमध्ये आरोपीचा पाठलाग करताना आणि आरोपींना पकडताना पोलिस अंमलदार ईजुलकुंटे यांच्या पायाला मार लागला तर पोलीस नाईक डफडे यांच्या हाताला मार लागला
पोलीस नाईक डफडे त्यांच्या तक्रारीवरून कलम 4/25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे लोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे.
पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बगाडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button