लोहा तालुक्यातील निराधारांची दसऱ्या नंतर “दिवाळी” साजरी 8 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा !
लोहा तालुक्यातील निराधारांची दसऱ्या नंतर “दिवाळी” साजरी : ८ हजार लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान जमा !
——————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा तालुक्यातील निराधार योजनेतील ८ हजार ३४१ लाभार्थ्याची दिवाळी साजरी झाली आहे.ऐन दिवाळीत या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे तहसीलदार एस एन लाड यांनी तसेच विभागप्रमुख यांच्यामुळे निराधारांची दिवाळी गोड झाली तर दसरा सणाच्या वेळी तत्कालीन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या काळात तीन महिन्याचे अनुदान
वाटप झाले
लोहा तहसील कार्यालय नेहमीच निराधार योजनेतील लाभार्थ्याना वेळेत अनुदान मिळावे त्याचे अर्ज वेळेत निकाली काढण्यासाठी तहसीलदार , नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख श्रीमती वैशाली चाटे, ऑपरेटर दयानंद मळगे हे तत्पर असतात त्यामुळे वेळेत निराधार योजनेतील लाभार्थ्याना अनुदान मिळते
केंद्र शासन व राज्य शासन योजनेतील निराधार लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2023 महिण्याचे दिवाळी सणाच्या काळात ८ हजार ३४१ लाभार्थ्याना अनुदान वितरित. करण्यात आले लोहा- या पात्र लाभार्थीच्या खात्यावर 1 कोटी 19 लाख 14 हजार 500 रुपयांचे ऑक्टोबर महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत त्यामूळे यांची दिवाळी गोड झाली .तहसीलदार एस एन लाड यांनी तातडीने यासाठी प्रयत्न केले
दसऱ्याच्या वेळी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे माहे जुलै , आउग सप्टेंबर 2023 चे अनुदान प्रत्येक लाभार्थी दीड हजार प्रमाणे आठ हजार तीनशे दहा लाभार्थ्याच्या खात्यात 3 कोटी 54 लाख 83 हजार 400 रुपये दसरा या सणाच्या दिवशी वाटप करण्यात आले होते आता दिवाळी गोड झाली
. तहसीलदार एस.एन.लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार अशोक मोकले, संजय गांधी विभाग प्रमुख श्रीमती वैशाली चाटे , आय.टी.असिस्टंट दयानंद मळगे यांच्या तत्परतेमुळे निराधारांना दिवाळी साजरी करता आली


