जिज्ञासा अभ्यासिकेत दिवाळी निमित्त ग्रंथ पूजन व होतकरू विद्यार्थीचा सत्कार !

जिज्ञासा अभ्यासिकेत दिवाळी निमित्ताने ” ग्रंथ पूजन”; होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार
—————————————————————————————-
लोहा (प्रतिनिधी )
लोहा शहर व परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा अभ्यासिका ‘गेल्या आठ वर्षा पासून गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक फिसतत्वावर सुरू करण्यात आली आहे.माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार याच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले तर माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल व सौ लक्ष्मी छत्रपती धुतमल यानी सपत्नीक महामानवाच्या प्रतिमेचे, सविधान व ग्रंथ पूजन करण्यात आले.यावेळी पीएचडी करणारे सिद्धांत महाबळे, वैभव महाबळे, सुधीर धनसडे, सोलापूरे या होतकरू विद्यार्थ्यांचा यसत्कार करण्यात आला
लोहा शहरात जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आठ वर्षा पूर्वी जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र पत्रकार हरिहर धुतमल , राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसिकर, विमा अधिकारी पांडुरंग भातलवंडे, कै. प्रशांत मोटरवार, रत्नाकर महाबळे, प्रकाश जिरेवार , प्रवीण धुतमल या मित्र परिवाराने सुरू केली .आता पर्यंत जवळपास ४० विद्यार्थी विविध शासकीय नौकरीला लागले तर यंदा १४ विद्यार्थ्यांचे राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोलीस ,व अन्य विभागात सरकारी नौकरीला लागले आहेत.
माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, माणिकराव मुकदम, किरण वट्टमवार, प्रा डॉ डी एम, पवार, केशवराव मुकदम, वसंतराव पवार, प्रसिद्ध फिजिशियन डॉ डी बी कानवटे, सेवानिवृत्त उपसंचालक गोविंदराव बिडवई हृदयरोग तज्ज्ञ ,डॉ मिलिंद धनसडे , दिनेश तेललवार, शरद पाटील पवार, सोनू संगेवार, करीम शेख, हृदय रोग तज्ञ डॉ राहुल घंटे,हरिभाऊ चव्हाण, संजय पाटील कऱ्हाळे, डॉ नांदेडकर ,डॉ संजय गुंडावार, डॉ .गणेश चव्हाण, यासह मित्रपरिवार यांचे सहकार्य असते
ग्रंथ पूजनाच्या वेळी उपनगराध्यक्ष दता वाले, प्रसिद्ध कंत्राटदार दता वसमतकर, नगरसेवक भास्कर पवार, नारायण येललवाड, गणेश बगाडे, पत्रकार रत्नाकर महाबळे, प्रा वसंत उतरवार, प्रा अनिस शेख, सोनाजी देशमाने, धनंजय संगवे, बिपीन पेनूरकर, मनोज पांचाळ संचालक प्रवीण धुतमल, बालाजी ढवळे, पोलीस नांदगावे, सिद्धांत महाबळे, वैभव महाबळे, सौ मंगल धुतमल, सौ सुषमा धुतमल, सौ शिल्पा हरिहर धुतमल, सौ प्रज्ञा प्रवीण धुतमल, कु सेजल धुतमल, सौ अनुजा मुकेश ढगे, व्यवस्थापक बालाजी धनसडे, तनय धुतमल , सुधीर धनसडे ,यासह मित्रपरिवार उपस्थित यावेळी प्रसिद्ध शासकीय गुतेदार दता वसमतकर यांनी अभ्यासिकेला खुर्च्या भेट दिल्या



