शिवछत्रपती विद्यालयात शिक्षक — पालक मेळावा संपन्न !

शिवछत्रपती विद्यालयात शिक्षक -पालक मेळावा संपन्न..!
————————————+++—-
लोहा (प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडीअडचणी तसेच पालकांचे आपल्या पाल्या बद्दल असलेल्या समस्या याची देवाणघेवाण व्हावी यासाठी शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक -पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार होते तर मुख्याध्यापक दामोदर वडजे ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार पालक शिवाजी पवार, सौ मनीषा शिंदे यांची उपस्थिती होते.
अध्यक्षीय समारोप करताना श्रीकांत पाटील पवार
यांनी शाळेत राबवित असलेले विविध उपक्रम सांगितले व पालकांनी पाल्याकडे विशेष लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले
शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे यांनी पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे नियमितपणे लक्ष दिले पाहिजे तसेच त्यांना अभ्यासाला बसविले पाहिजे .!त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची गरज असून जागरूक पालक म्हणून आपण त्यासाठी जागरूक असायला पाहिजे .वेळेवर शाळेत पाठविणे, अभ्यासाला बसविणे ,टीव्ही मोबाईल टाळणे आवश्यक आहे असे मार्गदर्शक मुख्याध्यापक यांनी केले व पालकांनी पाल्याकडे जागरूकपणे पाहावे असे आवाहन केले.शिक्षक -पालक संघाचे सचिव व्ही एस गुद्धे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी येत असलेल्या अडीअडचणी तसेच पालकांनी करावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.संचलन आर आर पिठ्ठलवाड , शेख एस एच यांनी केले यावेळी दिलीप काहळेकर, एस एच शेख , एस ई पवार ,हरिहर धुतमल, व्ही एस गुद्धे, आर आर पारेकर, मीनाताई काळकेकर, श्रीमती आढाव या शिक्षकांनी विषय निहाय आढावा सादर केला.एस आर शेटे , विठ्ठल वडजे , श्रीमती शेंडगे, श्रीमती खरात यांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले. आभार व्ही एस गुद्धे यांनी मानले.



