Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

आष्टूर येथे प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कुस्ती फडाचे उद्घाटन !

आष्टुर येथे प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कुस्ती फडाचे उद्घाटन !
——————————————-
लोहा ( रत्नाकर महाबळे)
आष्टुर या गावात दरवर्षी श्री दतात्रय देवाची यात्रा भरते त्यानिमित्ताने कुस्तीचा फड रंगत असतो.यंदा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कुस्तीचे उद्घाटन करण्यात आले.लालमातीतील हा फड गाजविन्या साठी आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान यात सहभागी झाले होते.
लोहा तालुक्यातील आष्टुर येथे श्री.दत्तात्रय यात्रे निमित्त दत्तात्रय मंदिरात जाऊन प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दर्शन घेतले. त्यानंतर कुस्ती फडाचे उद्घाटन व मानाची कुस्ती प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लावून उद्घाटन करण्यात आले यावेळी लोहा उपनगराध्यक्ष दत्ता वाले ,माजी जि.प. सदस्य चंद्रमुनी मस्के, युवा कार्यकर्ते सचिन मुकदम, संतोष (नाना) तिडके,परमेश्वर मुरकुटे, गणपतराव तिडके ,गावाचेंब,उपसरपंच बाबासाहेब
.बाबर,माजी सरपंच मधुकर पाटील.बाबर, चेअरमन माऊली .बाबर ,बाळू पाटील बाबर, अनिल .बाबर व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button