लोहा तालुक्यातील ८६ पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर ; अर्जाची अंतिम मुदत ८ तारीख !
लोहा तालुक्यातील ८६ पोलीस पाटील’, पदाचे आरक्षण जाहीर; अर्जाची अंतीम मुदत ८ तारीख व परीक्षा १४ जानेवारीला
——————————————-
लोहा (प्रतिनिधी )
लोहा तालुक्यातील ८६ गावांचे प्रवर्ग निहाय आरक्षण जाहीरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी डॉ. शरदकुमार मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली कंधार तहसील कार्यालयात ही सोडत पार पडली. लोहा तहसीलदार शंकर लाड, कंधार तहसीलदार राम बोरगावकर यांची विशेष उपस्थिती होती. तालुक्यातील आठ गावात अनुसूचित जातीचे, ५ गावात अनुसूचित जमातीचे तर ३१ गावात खुल्या प्रवर्गाचे पोलीस पाटील होणार आहेत. पोलीस पाटील या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसा पासून झाली असून ८ जानेवारी ही अंतीम तारिख राहणार आहे.तर १४ रोजी लेखी परीक्षा होणार आहे
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस पाटील’ पदाच्या भरतीची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी डॉ. शरदकुमार मंडलिक यांच्या मार्गदर्शनासाठी राबविण्यात येत आहे. लोहा तालुक्यातील ८६ गावातील पोलीस पाटील’ भरतीसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती (आठ), अनुसूचित जमाती (५), विमुक्त जाती (अ) (सहा), एनटी (क)- (४) भटक्या जमाती (ड)-(2), विशेष मागास प्रवर्ग (२), इतरमागास (२०), व खुला (३१) असे आरक्षण आहेत
. आरक्षण निहाय गावे या प्रमाणे
. एस. सी (गावे 8) – वाका (महिला), बोरगाव कोल्हा, येळी, जोशी सांगवी, लव्हराळ (महिला), डोंगरगाव, मजरे सांगवि, शंभरगाव ●अनुसूचित जमाती (ST) – सुनेगाव (महिला), नगारवाडी, वडेपूरी,ढाकणी (स्त्री), मारतळा ही पाच गावे
●विशेष मागास वर्ग–शेलगाव धानोरा, सायाळ या दोन गावात एसबीसी साठी पोलीस पाटील पद राखीव आहे.
●विमुक्त जाती (एनटी-अ), हिराबोरी तांडा, देवला तांडा (स्त्री), शेवडी तांडा, कांजळा तांडा रुपसिंग तांडा (स्त्री), धनज तांडा
●भटक्या मुक्त जाती (अ)- गुंडेवाडी, हरणवाडी, रामतीर्थ, भोपळावाडी
●भटक्या जमाती (ड)- नगारवाडी, आजमवाडी (महिला)
● इतर मागास प्रवर्ग – खेडकरवाडी, लांडगेवाडी, वाळकेवाडी, देऊळगाव(महिला) शेवडी (बा), बोरगाव किवळा, दापशेड, बेरळी खु मडकी,
कापशी खु. माळेगाव (यात्रा), पेनूर, पोखरी,
अंतेश्वर सावरगाव नसरत, किवळा,’ पिंपळगाव ढंगे, डोनवाडा, चौंडी, भारसवाडा ही 20 गावे इतर मागास प्रवर्गासाठी सुटली आहेत.
●आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – जवळा देशमुख, हळदव (महिला) मस्की गोलेगाव (प.ऊ), महिला) धनज खु. सुभाषनगर, भाद्रा, रमणेवाडी ही आठ गावे
●खुला — लिंबोटी, भेडेगाव, कारेगाव (महिला), दगड सांगवी, डोलारा, बेटसांगवी, शिवणी जामगा, चितळी (महिला) लोंढे सांगवी कामळज, पळशी, टाकळगाव, पांगरी, डेरला, पिंपरणवाडी, बेटसांगवी, किरोडा (महिला), हाडोळी (ज) धावरी, पिंपळगाव आकनाक (महिला), वागरदवाडी, घुगेवाडी, धानोरा (शे), कद्माची वाडी (महिला), काबेगाव, करमाळा, सेवादास तोडा असे ३१ गावे आहेत.
●लेखी परीक्षा १४ रोजी●
——————————
पोलीस पाटील पदाससाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यात पोलीस पाटील पदासाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे
ऑनलाईन अर्ज भरण्याची तारिख, १ जानेवारी पासून सुरुवात झाली असून ८जानेपर्यंत। ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण, संबंधित गावचा रहिवाशी असावा, वय २५ ते ४५ दरम्यान असावे अशी शैक्षणिक
पात्रता आहे .परीक्षा शुल्क व प्रवेश अर्ज भरण्यासाठी वेबसाईड देण्यात आली असून १४ जानेवारी रोजी लेखी परीक्षा होणार आहे



