Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहा नगरपरिषदेतील भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी मारोती शेळके यांचे आमरण उपोषण !

लोहा नगर परिषदेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण !
————————————————————————
लोहा (रत्नाकर महाबळे) लोहा नगरपरिषदेच्या 2018 पासून ते मे 2023 पर्यत झालेल्या विविध विकास कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारोती शेळके हे नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे
लोहा शहरात पालिकेने बेकायदेशीर पुणे गुंठेवारी करत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत ते शहरातील जनतेकडून वसूल केली आणि त्यांना पैसे भरल्यानंतर पावती देखील दिली नाही ते सर्व पैसे नगर परिषदेच्या निधी मध्ये जमा केले नाहीत.पालीकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर सोलार पोल बसवण्यासाठी सन 2019 मध्ये पाच कोटी रुपयांचा निधी लोहा नगरपालिका आला होता या कामातही मोठ्या प्रमाणात संबंधित अधिकारी व अध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच आपले काळें कारनामे उघड होवू नये यासाठी कार्यालयात लिपिक असलेल्यांना नियम बाह्य पदोन्नती देण्यात आली आहे.पाणीपुरवठा साठी ब्लिचिंग पावडर आणि तुरटी खरेदी मध्ये अनियमितता आढळून येते.घणकचरा व वृक्षारोपण यामध्ये देखील नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे आणि घनकचऱच्या माध्यमातून वीज निर्मिती आणि खत तयार करणार आहोत म्हणून हे टेंडर महिना 19 लाख रुपयास सोडवून घेतले. अध्यक्षांनी आपल्या मर्जीतील नगरसेवकांना हे घनकचरा टेंडर दिलं आहे तसेच शहरात पंचाहत्तर हजार झाडे लावण्याचे टेंडर काढले आणि कागदोपत्री व्यवहार करत पैसे उचलून घेतले पण शहरात प्रत्यक्षात एकही झाड लावले नाही.शहरात घरगुल मध्ये ही मोठा घोटाळा करण्यात आला आहे मुळ लाभार्थ्यां यांना घरकुल पैसे न देता आपल्या मर्जीतील लोकांना घरकुलाचे पैसे घेवून लाभ देण्यात आला आहे यासाठी अध्यक्षांनी नेमलेल्या आपल्या मर्जीतील दलालाकडून पैसे वसूल केले आणि मागणीत बसून त्यांना घरकुलाचे अर्ज वाटप केले आहेत असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक नांदेड, तहसीलदार लोहा, मुख्याधिकारी नगरपालिका लोहा, पोलीस निरीक्षक लोहा यांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button