बसस्थानक परिसरात उघड्यावर लघुशंका करणाऱ्या विरुद्ध लोहा पोलीसांनी केली गुन्हे दाखल !

बस स्थानक परिसरात खुलेआम लघुशंका करणाऱ्यांवर लोहा पोलिसांनी केले गुन्हे दाखल. !
——————————————
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणी दररोज लोहा बस स्थानकात हजार बसांची ये जा असते त्यामुळे हे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक नेहमीच गजबजलेले असते बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे हे येणारे प्रवासी बसस्थानक मध्ये मुतारी असून देखील याचा वापर करत नसल्याने महिला व शाळकरी मुली यांना याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत होता यांची येथील दबंग पोलीस अधिकारी ओमकांत चिंचोळकर यांनी दखल घेत स्वतः आज बसस्थानक जावून उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 9 जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोहा येथील बस स्टॅन्ड वर मोठ्या प्रमाणात वरदळ असते त्यातच गावातील लोक पण त्या ठिकाणी बसायला फिरायला नेहमीच जातात, लोहा येथील बस स्थानकामध्ये मुतारीची व्यवस्था केलेले असून पक्के बांधकाम केलेले आहे, तरीपण त्याचा वापर न करता अनेक जण बस स्टॅन्ड मधील बस थांबतात त्याला लागूनच मोकळ्या जागेमध्ये लघुशंका करतात
लोहा बस स्थानक येथे मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी शाळेतील विद्यार्थिनी ये जा करतात तसेच अनेक वेळा बस येईपर्यंत बस स्थानक मध्ये थांबून असतात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी त्यांच्या दृष्टीस पडेल अशा पद्धतीने निर्लज्जपणे अनेक लोक बस स्थानक मधील मोकळ्या जागेमध्ये लघुशंका करतात, सदरची बाब ही अत्यन्त वाईट असून महिलांना त्रास दायक होती. तसेच त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला होता.
यावर लोहा पोलिसांनी कडक कारवाई करून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या 9 व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशन येथे नेवून त्यांच्या वर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1949 कलम 115,117 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
तर अनेकांना जागीच चोप देण्यात आला.लोहा पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत होत आहे.



