Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

कै विश्वनाथराव नळगे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी अनिल हामदे यांची निवड !

कै विश्वनाथराव नळगे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी अनिल हामदे !
———————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे) लोहा शहरातील सुपरीचीत असलेली कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून नुकतेच विलास नागेश्वर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर संस्थेचे अध्यक्ष केरबाजी बिडवई यांनी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अनिल लक्ष्मणराव हामदे यांची निवड केली आहे.
अनिल हामदे हे गेल्या अनेक वर्षापासून कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करतात आणि ते लोह्यातील माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव हामदे यांचे चिरंजीव आहेत ते उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहे लहानपणापासून त्यांना क्रिकेटची आवड आहे लोहा शहरातील इलेव्हन स्टार क्रिकेट संघाची स्थापना केली त्या संघामध्ये ते उत्कृष्ट असे तेज गोलंदाज म्हणून नव्वदच्या काळात प्रसिद्ध होते.
संस्थेचे अध्यक्ष केरबाजी बिडवई यांनी त्यांना एक जुलै रोजी पदभार स्वीकार करण्यास सांगितले आणि पदभार दिला . यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंकर उत्तरवार, सचिव अशोक चिलीकवार, संचालक लक्ष्मीकांत बिडवई ,मावळते मुख्याध्यापक विलास नागेश्वर यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button