Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

रीसनगाव येथे वन उद्यानासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद — आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर !

रिसनगाव येथे वन उद्यानासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद —- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर!
——————————————–

लोहा (रत्नाकर महाबळे)

लोहा तालुक्यातील रिसनगाव व परिसरातील वन जमिनीमोठ्या प्रमाणात आहे .मागील काळात या वन परिसरात वन उद्यान व्हावे यासाठी पाठपुरावा केला पुन्हा तिसऱ्यांदा या भागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. विधिमंडळ सभागृहात येथील वनविभागाचा प्रश्न उपस्थित केला होता.वन पर्यटनासाठी भव्य
उद्यान उभारण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधीची तरतूद होईल
असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितल
लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची आढावा बैठक पार पडली
जिल्हा उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनरक्षक खेलवाडे, वन परिमंडळ अधिकारी रासने,नायब तहसीलदार डॉ हाडगे, कंधार माजी नगराध्यक्ष स्वप्नील लुंगारे परिमंडळ अधिकारी हागदळे, माजी उपनगराध्यक्ष दता वाले वनरक्षक घुगे, माळाकोळी चे
सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळीक, सा बां उप अभियंता मोहन पवार, जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता शिवाजी राठोड, वनरक्षक विजय मुंडे, माजी उपसभापती बालाजी कदम, सावरगाव मंडळ अधिकारी सूर्यवंशी मॅडम ग्रामसेवक रमेश राठोड यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी या आढावा बैठकीला उपस्थित होते
आढावा बैठकीत आमदार चिखलीकर यांनी रिसनगाव व परिसरातील अन्य गावातील वन जमिनीवर वन उद्यान उभारण्यासाठी शासनाकडे दहा कोटी रुपये उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना संबंधिना दिल्या
जिल्हा नियोजन समितीकडून पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून व येथे भव्य असे वन उद्यान उभारण्यात येईल त्यासोबतच विविध प्राणी याच्यासाठी मुक्त संचार होईल .तसेच विविध वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व त्याचे संगोपन करावे भविष्यात येथे मोठ्या प्रमाणात जंगल उपलब्ध झाल्यानंतर आजूबाजूचे पर्यटक देखील पर्यटनासाठी येतील .त्यातून या भागात छोटे मोठे व्यवसाय चालतील तसेच हा
भागाचा विकास देखील होईल
सर्वांनी वेगवेगळ्या भागांमध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी पुढाकार घ्यावाअसे सांगून
रिसनगाव परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर दहा हजार विविध प्रकारचे झाडे लावण्याचा संकल्प माझ्याच पुढाकाराने घेण्यात आला होता त्यापैकी 5000 झाडे लावून त्या झाडाचे संगोपन करून वाढ करण्यात आलेली आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा नमूद केले. आमदार चिखलीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

चौकट
खैराच्या झाडाची शेती उपयुक्त ठरणार
—————–+————————–
खैराच्या झाडांची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे द्यावे खैरांच्या झाडाची शेती ठराविक भागातच करण्यात येत होती पण लागवड क्षेत्र सर्व राज्यात झाले पाहिजे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू खैर वृक्ष हे औषधी निर्मितीचे झाड आहे. त्यामुळे खैराच्या झाडाला आगामी काळात चांगली मागणी असेल त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बळ देणाऱ्या या झाडाची लागवड करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. असे आवाहन प्रतापरावांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button