Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्यांस वर्गात शिक्षा ; गुरुजी विरोधात गुन्हा दाखल !

गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्यांस वर्गात शिक्षा; गुरुजीं विरुद्ध गुन्हा दाखल ; सुनेगाव शाळेतील घटना
———————-
लोहा (रत्नाकर महाबळे)

शिस्त -,क्षमता-कर्तव्य याची सांगड घातली जाते विद्यार्थी भविष्यात सुनागरिक म्हणून समजात वावरावे यासाठी शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापना सोबतच मुल्य संस्कार देत असतात पण हल्ली पालकांची परिभाषा बदलली आहे. पाल्याना छडी मारली वा पाठीत थापाटे( छडी मारणे) दिले तरी ते शाळेत येऊन भांडण करताहेत असा घटना दिवसागणिक वाढ होत आहे असेच लोहा शहरा जवळील सुनेगाव प्रशालेत घडले. शाळेत विद्यार्थी वर्गात गोंधळ करीत असल्यामुळे शिक्षकांनी त्याला सौम्य शिक्षा केली त्यामुळे पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले व शिक्षकांच्या विरुद्ध तक्रार दिली
ज्या शाळेत ही घटना घडली तेथील गुरुजन पुढील काळात विद्यार्थ्यांना शिक्षा करणार नाहीत त्यामुळे त्या शिक्षकांचे नव्हे तर ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे पोलीस कार्यवाहीमुळे शिक्षकांची मानसिकता शाळा सुटण्याची(?) बदली कधी होईल (?) अशीच राहणार आहे लोहा तालुक्यातील सुनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप झाल्या नंतर शाळेतील सर्वाना यंदा पासून बूट व सॉक्स दिले जात आहेत शिक्षक ते विद्यार्थ्यांना वाटप करत होते तर
पाचवी वर्गात विद्यार्थी गोधळ करत होते म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली .पण पाल्याना घरी जाऊन पालकांना सांगितले.. पालक थेट आपल्याच गावातील परिचित शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तक्रार दिली त्यावरून अदखल पात्र पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुजींनी शिक्षा केली म्हणून पालक थेट पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकांच्या विरोधात तक्रार देत असतील तर शिक्षकांची मानसिक काय असेल (?) त्याचा परिणाम अध्ययन अध्यापनावर निश्चितच होणार आहे त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होईल ही बाब ग्रामस्थांना कळली पाहिजे पण या गावात नेहमीच शिक्षकांच्या बाबत ग्रामस्थ पालक वाद करतात त्यामुळे उपक्रमशील असलेले शिक्षक निरुत्साही तर होताहेत पण विद्यार्थ्यांना गोधळ केला शाळेत आला नाही गृहपाठ केला नाही दुसऱ्या विद्यार्थ्यांस मारले तरी त्यास चापट सुद्धा मरणार नाहीत त्याचा विपरीत परिणाम शाळेवर होणार आहे.ज्या गावात राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आहेत. कडक शिस्तीचे शिक्षक आहेत त्याच्या हातून हजारो गुणवंतविद्यार्थी, सुनागरिक घडले त्याच्या गावात असा घटना निश्चितच चिंतनीय आहेत असा सूर शिक्षक वर्गात उघडपणे बोलला जातोय शिक्षक चुकले असतील तर त्यांना सांगणे गरजेचे आहे सामोपचाराने असे प्रश्न हाताळणे गावाच्या शिक्षक -पालक – शाळेच्या हिताचे ठरणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button