पानभोसीच्या सरपंच सौ राजश्री भोसीकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान !

पानभोसीच्या सरपंच सौ.राजश्री भोसीकर ” आदर्श सरपंच” पुरस्कार प्रदान
———————————++—-
लोहा(प्रतिनिधी)
पानभोसी गावच्या सरपंच राजश्री मनोहर पाटील भोसीकर याना राजर्षी शाहू महाराज आदर्श सरपंच पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले आहे
जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक मनोहर पाटील भोसीकर यांच्या सुविद्य पत्नी राजर्षी पाटील भोसीकर याना स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष मराठी पत्रकार संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा राजर्षी शाहू महाराज समाजभुषण आदर्श सरपंच पुरस्कार -२०२३ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले , जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक मनोहर पाटील भोसीकर,दक्ष मराठी पत्रकार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव श्रीमंदीलकर, उपसरपंच शिवकुमार भोसीकर, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे



