उपमुख्याध्यापक बी डी जाधव यांनी शाळा –विद्यार्थ्यांचे कायम हित जोपासले — खा चिखलीकर !

उपमुख्याध्यापक बी डी जाधव यांनी शाळा-विद्यार्थ्यांचे कायम हित जोपासले -खा चिखलीकरांचे गौरवोद्गार !
——————————————–
लोहा ( रत्नाकर महाबळे)
शाळा व विद्यार्थी यांचे हित संपूर्ण सेवेत शिक्षक-उपमुख्याध्यापक म्हणून बी डी जाधव यांनी जोपासले. आहेत कडक स्वभाव पण निर्मळ मन असलेले बी डी हे जीवभावाचे मित्र आहेत म्हणून दिल्लीहुन मुद्दामहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आली आहे.ऍड मुक्तेश्वर धोंडगे यांनीही त्यांना सांभाळून घेतले. सहकार्य – सद्भावना असा त्याचा स्वभाव आहे असा शब्दात जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गौरवोद्गार काढले.
श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बी डी जाधव यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला दिल्लीहून शुभेच्छा देण्यासाठी खास प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोह्यात आले होते .त्यांनी सपत्नीक श्री जाधव यांच्या सत्कार केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई गुरूनाथराव कुरुडे तर व्यासपीठावर ,शिवसेना सहसंपर्कप्रमुख मुक्तेश्वर धोंडगे, माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, शिवसेनेचे एकनाथ पवार, माजी नगराध्यक्ष किरणं वट्टमवार, प्राचार्य डॉ अशोक पाटील गवते, पत्रकर प्रल्हाद उमाटे , माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील नगरसेवक करिम भाई शेख भास्कर पाटील पवार माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड , माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, नारायण यल्लरवाड माधवराव पाटील गायकवाड, मारोतराव पाटील बोरगावकर बालाजी पाटील बोरगावकर माधव पाटील पवार बंन्डु पाटील वडजे ,सुदर्शन शिंदे
, मुख्याध्यापक बी एस बोधगिरे ,व ससर्व स्टॉप , माजी सभापती खुशाल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर मुख्याध्यापक दामोदर वडजे, प्रा चव्हाण, यासह मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते
यावेळीभाई कुरुडे, ऍड मुक्तेश्वर धोंडगे,प्राचार्यडॉ अशोकराव गवते , शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार, शरद पाटील, भास्कर पवार, प्रा बालाजी चव्हाण, श्रीकांत तेलंग, यांची भाषणे झाली .बी डी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले .संचलन विक्रम कदम यांनी तर आभार विवेकानंद घोरबांड यांनी मानले.या सोहळ्याला मोठ्या संख्येने कर्मचारी आप्तस्वकीय मित्रपरिवार उपस्थित होते



