Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर पी कोकरे यांना तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर !

सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. पी. कोकरे गुरूजी यांना “तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
अंत्यत गरिबीतून शिक्षण घेऊन सतरच्या दशकात शासकीय सेवेत माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झालेले आर पी कोकरे हे आजच्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने तुफानातले दिवे आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत झोकून देत धम्माचे कार्य वयाची ऐंशीच पार केल्यानंतरही त्यांनी सुरूच ठेवले आहे.त्याच्या कार्यांची नोंद घेत कविवर्य वामनदादा कार्डक जयंती निमित्त त्यांना “,तुफानातले दिवे ‘हा पुरस्कार जाहीर झाला असून ३१ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. पी. कोकरे यांनी *माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड* च्या निर्मितीत अग्रणी योगदान दिले आहे त्यांनी *बावरीनगर येथील महाविहार, नेरली (कु.), मालेगाव, जवळा ( दे.), नालंदा नगर सह नांदेड शहरातील* अनेक बुद्ध विहाराच्या विकास आणि निर्मितीत त्याचे सहकार्य लाभले आहे
माध्यमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्याची
सेवा प्रेरणादायी आहे
२००४ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. महात्मा फुले शिक्षक परिषदेने त्यांना महाराष्ट्र राज्य स्तरीय *समाज भूषण* पुरस्कार दिला कविवर्य वामनदादा कर्डक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष . संजय निवडणगे यांनी हा पुरस्कार जाहीर केला हा पुरस्कार
. 31 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे दुपारी 2 वाजता प्रदान केल्या जाणार आहे.पुरस्कारा बद्दलपूज्य भिक्खू शीलरत्न थेरो, भा.बौ.महासंघाचे नांदेड उत्तराचे कार्यालयीन सचिव . सा. ना. भालेराव, रमेश सूर्यवंशी, अल्केश ओहळ, रुक्माजी कोकरे, सरचिटणीस रमेश कोकरे, राजेश बिऱ्हाडे, साहेबराव गायकवाड, प्रवीण कुपटीकर, भीमराव सोनाळे, सुभाष मल्हारे, माजी मुख्याध्यापक इंद्रजीत नरवाडे, तसेच माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या अध्यक्ष जयाताई सूर्यवंशी, भारती बिऱ्हाडे, रेखा कोकरे, सागर मल्हारे यांनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button