Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

लोहा तालुक्यातील निळा शिवारात बिबट्या नव्हे तर तडस किंवा लांडगा असण्याची शक्यता ?

लोहा तालुक्यातील निळा शिवारात बिबट्या नव्हे तर तडस किंवा लांडगा असण्याची शक्यता (?)

——————————————
आखाड्यावरील कुत्र्यास जिवंत पाडले
, वनविभागाकडून हेल्पलाईन जाहीर
———————–

लोहा, (प्रतिनिधी )
लोहा तालुक्यातील निळा गावच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याची शंका व्यक्त होत असतानाच एका आखाड्यावरील कुत्र्याला बिबट्याने फाडले. .त्यामुळे बिबट्याने फाडले असावे अशी त्याच्या पायाच्या ठशा वरून अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निळा ( ता लोहा) येथील शेतकरी उमर शेख हे जनावरांचे चारापाणी करून, घरी परतले त्यानी कुत्रा आखाड्यासमोर बाहेर बांधला होता सकाळी पुन्हा शेतात गेले तेव्हा
आखड्यावरील बांधलेल्या कुत्र्यास फाडून काढले व अर्धवट सोडून दिल्याचे त्यांना दिसले
गाय-बैल-वासर शेडमध्ये होती त्यामुळे ती बचावली
कुत्र्याला फाडून काढले त्या घटनेची माहिती गावात व वनविभागाला कळली तेव्हा ठसे व पाऊल खुणा पाहता बिबट्यानेच कुत्र्याला फाडले असावे असा अंदाज व्यक्त
केला जातोय ही घटना २५ तारखेला रात्री घडली त्यानंतर वन विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून वन विभागाने ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे लाऊड स्पीकर द्वारा आवाहन केले
प्रकार घडल्या नंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे याना ग्रामस्थांनी माहिती दिली .वनपरिमंडळ अधिकारी कैदारवाड, वनपाल घुगे वनरक्षक लक्ष्मण पांडूरणे, शेवडीकर , अन्य टीमने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली
ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

●चौकट

तडस किंवा लांडगा असण्याची शक्यता
———————– —— —-
निळा येथील घटनेत कुत्र्यांचे पोट फोडले पण बिबट्या व वाघ हे प्राण्यावर हल्ला करताना सुरुवातीला मानेवर हल्ला करतो व ठार करतो व नंतर शरीराच्या मागिल बाजूने खाण्यास आरंभ करतो पण निळा येथील घटनेत तसे दिसले नाही व पायाचे ठसे लहान आकाराचे होते त्यावरून हे बिबट्याचे नसावेत असा दावा वनविभागाच्या तज्ज्ञांनी केला तडस किंवा लांडगा असावा असे वनविभागाच्या वतीने सांगितले व भीती बाळगू नये काही आढळल्यास १९२६ या हॅलो फॉरेस्ट ( वनविभाग) हेल्पलाईन वर संपर्क साधावा आवाहन लोहा तालुका वनपरिमंडळ अधिकारी अशोक क्यादरवाड , वनरक्षक ( मंगरूळ) परमेश्वर घुगे , शेवडीकर यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button