Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

भाजपचे चंद्रसेन पाटील यांच्या माळाकोळी बालेकिल्ल्यात भिमाशंकर कापसे यांची मोर्चेबांधणी !

भाजपाचे चंद्रसेन पाटील यांच्या माळाकोळी बालेकिल्ल्यात भीमाशंकर कापसे यांची ” मोर्चे बांधणी
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
विधानसभा निवडणुकीत एकाच पर्व -ओबीसी सर्व” या घोषणेचा आवाज मराठा आरक्षण विरोधात गावोगावी एकवटला त्याचा फायदा जनहित लोकशाही पार्टी चे उमेदवार चंद्रसेन पाटील सुरनर यांना झाला २९हजार इतकी मते मिळवीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.निकाल नंतर महिन्यातच त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.त्यांच्या बालेकिल्ल्यात पुण्याहून आलेले उद्योजक भीमाशंकर कापसे मामा यांनी तयारी सुरू केली आहे.त्यांचा पक्ष कोणता (?) अद्याप ठरले नाही पण पराभूत उमेदवारांपासून ते विजयी झालेल्या आणि प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांना “मामा”भेटत आहेत.त्यांच्या माळेगाव -माळाकोळी भागातील गावनिहाय बैठकीची राजकीय चर्चा जोरात सुरु आहे
लोहा विधानसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षांपूर्वी पुण्याहून एकनाथ पवार हे आले .त्यांनी विधानसभा लढविली.मराठा आरक्षण फॅक्टर जोरात होता. हवा होती पण त्याची दिशा बदलू शकले नाहीत.त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला साठ हजार मतदारांचा तसा भ्रमनिरासच झाला. महायुती पुन्हा सतेत आल्या नंतर मतदारसंघातील “हम पांच” ( बालाजी पांडागळे
शरद पाटील, विजय धोंडगे, चंद्रसेन पाटील डॉ सुनील धोंडगे) यांनी मेरे दिलमे कमल का फुल “। ,म्हणत भाजपात प्रवेश केला,.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चिखलीकर विरोधक अशी याची ओळख आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन महिन्यांत
होणार आहेत(?) माळेगाव -माळाकोळी हा जिल्हा परिषद मतदान संघ (पूर्वी ,)ओबीसी साठी सुटका आहे या गटात २४ तांडे व ६वाडी आहेत . शिवाय ओबीसी समाज घटक अधिक आहे. या गटाचे रुस्तुम धुळगंडे, बाजीराव भालेराव ,आणि चंद्रसेन पाटील यानी नेतृत्व केले.
निवडणूकीत या भागात चन्द्रसेन याना खूप मतदान झाले. त्या काळातील हवा पुढे ही अशीच राहील (?) असे नाही . वाडी तांडे तसेच मराठा विरुद्ध ओबोसी असे अनेक कंगोरे येत्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात राहणार आहेत.
पुण्याहून आलेले आणि याच भागातील भूमिपुत्र भीमाशंकर कापसे हे माळाकोळी भागात गावोगावी भेटीगाठी घेत आहेत. कापसे मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत.दादा आले पण फारसा प्रभाव पडू शकले नाहीत .आता “मामा” येत आहेत त्यांची इन्ट्री राजकारणात झाली.प्रसाद, व विनोद याचे मार्गदर्शक आहेत .कुस्ती मोठी आहे. चन्द्रेसन पाटील आणि बालाजी राठोड या दोघांची सध्या तयारी सुरु आहे.या भागात “वंचित’ ला मानणारा ,मतदार संख्या अधिकची आहे.या भागात ओबीसी विरुद्ध मराठा ” असा मतप्रवाह नेहमीच सक्रिय असतो.कापसे मामा यांनी चन्द्रसेन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मोर्चे बांधणी सुरू केली आहे.त्यांच्या साठी हा भाग नवीन आहे शिवमय आव्हानही मोठे आहे.चन्द्रसेन विरुद्ध कापसे मामा विरुद्ध बालाजी राठोड अशीच लढत तूर्तास अपेक्षित आहे (?) पुण्याचे आणखी एक उमेदवार या भागात राजकीय भविष्य आजमाविणार असे दिसते .भेटी सगळ्याचा घेताहेत नेमके पक्ष कोणता (?) हे प्रसाद पोले, विनोद गवते पाटील हे मामांचे मार्गदर्शकच सांगू शकतील पण कापसे मामांनी जिल्हा परिषद निवडणूकी साठी दंड थोपटले आहेत एवढे खरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button