Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

स्व केशवराव धोंडगे यांची नितांत मातृभक्ती जगात कुठेही सापडणार नाही — प्रा फ मु शिंदे

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या १०३ वा जयंती समारोह उत्साहात संपन्न

स्व.केशवरावांची नितांत मातृभक्ती जगात कुठेही सापडणार नाही – प्रा. फ. मु शिंदे
——————————————-
लोहा,(रत्नाकर महाबळे)
स्व.केशवराव धोंडगे साहेबांचे अतिशय प्रखड , प्रेमळ, अभ्यासू व्यक्तिमत्व होते.नाही रे वाल्यांची त्यांनी आयुष्यभर सेवा करत अडचणीत असलेल्या गोरगरिबांचे नेहमीच प्रश्न सोडविले.एका वेगळ्या विचारांची संजिवनी स्व.केशवरावांनी संबंध राष्ट्राला दिलेली आहे.आई बद्दल फार प्रेम होते.स्व.केशवरावांची नितांत मातृभक्ती जगात कुठेही सापडणार नसल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक प्रा.फ.मु.शिंदे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या १०३ वा जयंती समारोह निमित्त महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक प्रा.फ. मु. शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम शहरातील तुळजाई मंगल कार्यालयात दि.(२२) जुलै रोजी संपन्न झाला.
प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे माजी जि.प.अध्यक्ष,प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रोहिदास चव्हाण, गंगाखेड चे माजी आमदार हरी गायकवाड,प्रा डॉ पुरूषोत्तम भाऊ धोंडगे,प्रा.डॉ.सौ.मनिषाताई धोंडगे, शालेय समिती चे अध्यक्ष भाई किशनराव ढगे,सुभाष मामा जाधव केरवाडीकर, प्राचार्य डॉ अशोक गवते,जयक्रांती गवते,मणकर्णिका गवते,मुख्याध्यापक डी एस बोधगीरे,लुंगारे सर, भगवान पा.सुरनर,राजु पा.जाधव, बालाजी गीरी महाराज,नवनाथ पा.जाधव आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना फ.मु.शिंदे प्रा. डॉ. पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्यावर दृष्टीक्षेप टाकत म्हणाले की केशवराव धोंडगे साहेबांची मुलं ही कुणाला डगमगणारी नाहीत जनतेची काम करणारी मुलं आहेत.तसेच कुणाला घाबरणारी नसल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे. नक्कीच ते संधीचे सोनं करून दाखवतील कवींचा आशीर्वाद कवींची भविष्यवाणी खरी ठरते असे सूचक वक्तव्य करत त्यांनी प्रा. डॉ.पुरूषोत्तम धोंडगे यांच्या युवा मंच कंधार लोहा च्या वतीने होत असलेल्या कार्याची दखल घेऊन व पुरुषोत्तम भाऊंचे काम पाहता त्यांची भविष्यवाणी ठरवत आशीर्वाद दिले.शेवटी त्यांनी उपस्थितांना आई विषयीचे वात्सल्य ,प्रेम, माया, व्यक्त करत स्वतः बद्दल व स्व. धोंडगे साहेबांबद्दलचे आई विषयीचे विचार काव्याद्वारे व्यक्त करत
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं
….. आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही”
याद्वारे मुक्ताईसुत स्व. केशवरावजी धोंडगे यांचे आई बद्दलचे प्रेम काव्या द्वारे फ.मु.नी व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन जयराम सुर्यवंशी आभार मुख्याध्यापक डी एस बोधगीरे यांनी मानल
स्व. भाई केशवराव धोंडगे साहेबांनी निस्वार्थपणे गोरगरिबांची सेवा केली .अनेक मोर्चे आंदोलने करून आयुष्यभर गरिबांच्या कल्याणासाठी झगडले. कधीच मोबदला घेतला नाही. त्यांचे आई विषयी नितांत प्रेम होते.आईला दैवत मानत असत. राज्याच्या नसून देशाच्या विधिमंडळातील एकमेव लोकप्रतिनिधी यांचे १०१ वर्ष शतकोत्सव वर्ष म्हणून साजरे केले गेले. ही बाब अतिशय दुर्मिळ आहे. आज-काल कुणीही यायलेत मोठं मोठे बॅनर लावलेत अन् भावी आमदार म्हणालेत असा उपरोधिक टोलाही नाव न घेता सध्याच्या घाणेरड्या राजकारण करणाऱ्यांना लगावला. प्रा. डॉ . पुरुषोत्तम धोंडगे यांच्या भाऊचा डबा, कोरोना काळातील कार्य,नेत्र शस्त्रक्रियेची एक सामाजिक उपक्रम हाती घेतला म्हणून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी प्रशंसा केली
अध्यक्षीय समारोपात बोलताना नांदेड जि प चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी मी शाळेचा माजी विद्यार्थी असून स्व.केशवरावजी धोंडगे साहेबांनी आयुष्यभर वंचित शोषित लोकांची बाजू घेतली न्याय मिळवून दिला मातोश्री अडाणी,अज्ञानी होत्या वेगळं असं बाळकडू केशवरावांना दिले.. लिंबोटी धरणाचे खरे निर्माते किशोरजी धोंडगे साहेबच असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button