शिव छत्रपती विद्यालयातील शिक्षक कै प्रशांत मोटरवार यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने शालेय साहित्य वाटप !

शिक्षक कै प्रशांत मोटरवार यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने शालेय साहित्य वाटप
——————————————–
लोहा (प्रतिनिधी) शिवछत्रपती विद्यालयातील विज्ञान शिक्षक प्रशांत सुभाषराव मोटरवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यानंतर जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रात कै मोटरवार याना अभिवादन करण्यात आले.
शिवछत्रपती विद्यालयाचे विज्ञान विषयाचे शिक्षक कै प्रशांत सुभाषराव मोटरवार यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोटरवार परिवाराच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी विठ्ठलेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक लक्ष्मीकांत बिडवई, मुख्याध्यापक दामोधर वडजे, मुख्याध्यापक एच जी पवार,
युवा कार्यकर्ते सचिन मुकदम, नागेश दमकोंडवार, इंजि प्रमोद मोटरवार, पंकज मोटरवार, सुशील मोटरवार, व्यंकट जंगले,शफी नाले, बि एन गवाले, आर आर पिठ्ठलवाड, ,आर आर पारेकर,
तसेच मोटरवार याचे चिरंजीव व कन्या उपस्थित होते
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार, मुख्याध्यापक श्री वडजे, कांता बिडवई, सचिन मुकदम, मुख्याध्यापक पवार, पंकज मोटरवार, नागेश दमकोंडवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. हरिहर धुतमल यांनी मोटरवार गुरूजीच्या आठवणी सांगितल्या तर संचलन आर आर पिठ्ठलवाड यांनी केले
जिज्ञासा अभ्यासिकेत अभिवसदन
———————————-
जिज्ञासा अभ्यासिका सुरू करण्यात कै प्रशांत मोटरवार यांचे योगदान होते . तृतीय पुण्यस्मरणा निमित्ताने अभ्यासिकेत त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सचिन मुकदम, कांता बिडवई, प्रवीण धुतमल, नागेश दमकोंडवार, पंकज मोटरवार व्यवस्थापक बालाजी धनसडे यासह मित्रपरिवार उपस्थित होते



