प्रणिता ताई यांच्या हस्ते एकल पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

माजी खा.प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवस
—————––— ——–
लोह्यात प्राणिताताई यांच्या हस्ते “एकल पाल्यांना” शैक्षणिक साहित्य वाटप
——————–+——————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
ज्या विद्यार्थ्यांना आई नाही -वडील नाहीत जाही जण ते पोरकेच असलेले विद्यार्थी .तर दुसरीकडे आणि गरिबी मुळे रोजंदारी करून शाळेत शिकणारे विद्यार्थी याना जिल्ह्याचे नेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
जलचळवळी प्रनेत्या प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले
जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अठरा वर्षा पासून हरिहर धुतमल यांच्या पुढाकाराने गरजवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते यंदाही लोह्यातील जिज्ञासा अभ्यासिका शिवकल्याण नगर येथे कालवश संभाजीराव धुतमल प्रतिष्ठानाच्या वतीने हरिहर धुतमल, प्रवीण धुतमल यांच्या वतीने “एकल पाल्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, सरस्वती पतसंस्था व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, महिला उपजिल्हाध्यक्षा शोभाताई बगडे – नळगे,कंधारेवाडी येथील भूमिपुत्र इंग्लड येथे अभियंता असलेले डिगोळे,पत्रकर रत्नाकर महाबळे
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसिकर, हरिहर धुतमल, संचालक प्रवीण धुतमल, संगवे ,यासह मान्यवरांची उपस्थिती होती
प्राणिताताई देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एकाग्रतेने अभ्यास करावा तसेच एकल पाल्य आहेत त्यांना गणवेश देण्याची घोषणा केली प्रतापराव पाटील हे नेहमीच गरजवंताला सहकार्य करतात .स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी खासदार चिखलीकर साहेबांनी नेहमीच सहकार्य ,मदत केली आहे.आपणास कोणतीही अडचण असो जिज्ञासा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना मदत करू असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांनी मेहनत करावी यश मिळवावे असे मार्गदर्शन प्राणिताताई यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.अभियंता डिगोळे , तसेच अभ्यासिकेतील सखाराम येवले याची परभणी पोलिसात निवड झाल्या बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला
संचालक हरिहर धुतमल यांनी प्रास्ताविक केले संचलन काशिनाथ शिरसिकर यांनी तर आभार रत्नाकर महाबळे यांनी केले

