Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नांदेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन !

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नांदेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्याचे आयोजन!
——————————————–
नांदेड (रत्नाकर महाबळे)
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण नांदेड च्या वतीने रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन श्रद्धा स्थळ भीमघाट नालंदा बुद्ध विहार नांदेड येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पूजनीय भंते बोदीधम्मो चैत्यभूमी मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. हौसाजी वारघडे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पी एस बोरगावकर साहेब अप्पर जिल्हाधिकारी नांदेड, एडवोकेट विजय गोणारकर प्रख्यात विचारवंत, प्रा. चंद्रकांत धुमाळ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली, मा. न्यायाधीश यशवंत चावरे विभागीय संघटक, संबोधी सोनकांबळे मा. विभागीय सचिव, युवराज मोरे ऑडिटर महाराष्ट्र राज्य, पि एम वाघमारे संस्कार उपाध्यक्ष
रत्नाकर महाबळे जिल्हा सरचिटणीस, बि,डी कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष, रेखाताई पंडित जिल्हाध्यक्ष महिला नांदेड, चित्रलेखा कांबळे जिल्हा सरचिटणीस महिला, अर्चना कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष महिला या कार्यक्रमाला सर्व नांदेड जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी जिल्हा दक्षिण कार्यकारणी पुरुष महिला सर्वांनी उपस्थित राहावे.असे अहवान संस्कार सचिव चंद्रकांत चौदंते, मारोतराव गोडबोले, यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button