माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड !

माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
——————————————-
लोहा (प्रतिनिधी )
लोहा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांची भारतीय जनता पार्टीच्या नांदेड
दक्षिण ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.पूर्वी त्याच्याकडे लोहा भाजपा शहराध्यक्ष पद होते. निरपेक्ष समर्पित भावनेने जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलकर यांच्या साठी व पक्षासाठी कार्य करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्याची ओळख आहे
नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे यांनी भाजपा जिल्हा कार्यकारणी जाहीर केली.जिल्हा उपाध्यक्ष म्हणून लोहा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांची नियुक्त करण्यात आली आहे.त्याच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शहरात कायम।स्वरूपी पाणीपुरवठा योजना, रमाई आवास योजना तसेच संपूर्ण शहरातील मतदारांचा एक लक्ष रुपयांचा अपघाती विमा त्यांनी प्रभावीपणे राबविला . मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील लोह्याच्या तीन भूमीपुत्राना रझाकरांशी लढताना हौतात्म्य प्राप्त झाले त्याचे वारसदार तसेच मुक्ती संग्राम लढ्यात सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सौनिकांच्या पाल्यांचा स्मृती चिन्ह व मानपत्र देऊन त्याच्या कार्यकाळ गौरविण्यात आले.तसेच शहरातील सर्व शाळांचा प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला व शाळांना बक्षीस दिली.पक्षनिष्ठा व तळमळीचे कार्यकर्ते अशी त्याची ख्याती आहे.त्याच्या निवडी बद्दल खा प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्ह्यध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर, सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपाध्यक्ष दता वाले, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, हरिभाऊ चव्हाण, प्रा डॉ डी एम पवार, दिनेश तेललवार, यासह मित्रपरिवार यांनी त्याचे अभिनंदन केले आहे


