Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

भारतीय बौद्ध महासभा महाबोधी महाविहार मुक्ती साठी कायदेशीर लढाई लढणार — भिमराव आंबेडकर !

महाबोधी विहारासाठी कायदेशीर लढाई लढू — भिमराव आंबेडकर !
——————————————-
मुंबई (रत्नाकर महाबळे ) बिहार येथील महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा कायदेशीर लढाई लढून हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देऊ असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मुंबईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी डॉ. हरीश रावलिया ट्रस्टी चेअरमन , ॲड एस के भंडारे केंद्रीय कार्यालयीन प्रमुख, महाराष्ट्राचे प्रभारी भिकाजी कांबळे ,महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष यु जी बोराडे, सरचिटणीस अशोक भाऊ केदारे, कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले की महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावर भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल सुरू आहे त्यामुळे आपण आज प्रगतीकडे आहोत. बिहार येथील भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली तेथे सम्राट अशोकाने महाबोधी महाविहार स्थापित केले ते मुक्त व्हावे या साठी मेघालय येथील आकाशलामा यांनी आंदोलन सुरू केले त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला संपूर्ण देशभरातून लोकांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बुद्धगया येथे आंदोलन केले पण त्यात फारसे यश आले नाही जोपर्यंत बिहार राज्यातील 38 जिल्ह्याचे लोक त्यामध्ये सामील होणार नाहीत तोपर्यंत ती लढाई जिंकणे आपणास शक्य होणार नाही त्यासाठी बिहार मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हमे भेटून त्यांना याबाबत विचार विनिमय केला आणि बिहार राज्यातील लालूप्रसाद यादव यांचे दोन आमदार यांनी यासाठी बिहारच्या विधानसभेमध्ये आवाज उठवला आहे त्यांना आणि बिहार मधील जनतेला सोबत घेऊन भारतीय बौद्ध महासभा ही कायदेशीर लढाई लढणार आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका देखील दाखल केलेली आहे आणि त्यासाठी तज्ञ वकिलांची टीम देखील तैनात केली आहे आणि ही कायदेशीर लढाई आपण जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष हिशोब तपासणी उपस्थित होते.
हिंदी भाषेची सक्ती नको….
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवावी अशी शक्ती करत आहेत त्याला भीमराव आंबेडकर यांनी विरोध दर्शविला जास्त भाषा येणे हे चांगले आहे पण ती सक्ती करणे चुकीचे आहे राज्य सरकार समाज कल्याण विभागाचा निधी लाडक्या बहिणीवर खर्च करत आहे हे अत्यंत घातक आहे समाज कल्याण विभागाचा निधी जर अशा प्रकारे इतरत्र खर्च होत असेल तर ही अत्यंत खेदायक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button