शिवसेनेच्या लोहा –कंधार विधानसभा प्रमुख पदी मिलिंद पाटील पवार यांची नियुक्ती !

शिवसेनेच्या लोहा -कंधार विधानसभा प्रमुख पदी मिलिंद पाटील पवार यांची नियुक्ती !
—————————————-
लोहा (रत्नाकर महाबळे)
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे शिवसेना शिंदे गटाचे लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल शिवसेना पक्षाने घेऊन त्यांच्यावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनां बढती देऊन त्यांच्यावर लोहा -कंधार विधानसभा प्रमुखाची जबाबदारी सोपवली आहे.
याबाबत लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका शानदार कार्यक्रमात मिलिंद पाटील पवार यांना लोहा -कंधार विधानसभा प्रमुख पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीताताई पुरोहित यांच्या हस्ते देण्यात आले.
सदरील नियुक्ती पत्र हे शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले असून नियुक्ती पत्रात पुढे असे नमूद केले की,नमूद वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व युवा नेते खा.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या विधानसभा प्रमुख पदी ( कार्यक्षेत्र लोहा -कंधार विधानसभा) नियुक्ती करण्यात येत आहे .
वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच मिलिंद पाटील पवार यांची शिवसेनेच्या लोहा -कंधार विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे संपर्क नेते आनंदराव जाधव,खा. हेमंत पाटील,आ. बालाजी कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीताताई पुरोहित यांनी अभिनंदन केले.



