Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

बहुजनांनी आता शिक्षणासाठी रस्त्यावर आले पाहिजे — डॉ दिपक कदम !

बहुजनानी आता शिक्षणासाठी रस्त्यावर आले पाहिजे— डॉ दिपक कदम !
——————————————–

लोहा (रत्नाकर महाबळे) बहुजन समाजातील व्यक्तींनी रस्त्यावरची लढाई लढण्यामध्ये आपला वेळ घातला ते सोडून आता शिक्षणासाठी रस्त्यावर आलं पाहिजे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब मशीनचे प्रमुख डॉक्टर दीपक कदम यांनी सम्यक संकल्प फाउंडेशनने लोहा येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर येथे कार्यरत असलेले व लोहा तालुक्यातील भुमिपुत्र पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले , हृदयरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद धनसडे, देगलूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे, ग्रामीण टेक्निकल इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक डॉ ओमप्रकाश दरक, उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ जयसुर्या कुंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉक्टर दीपक कदम म्हणाले की देशातील आणि राज्यातील सरकार हे संविधान विरोधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मोफत शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे त्यामुळे राज्यातील मोफत शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावरून शिक्षणासाठी ही लढाई लढली पाहिजे तरच आपल्याला यापुढे शिक्षण मिळणार आहे पाण्याचा हजारो रुपये खर्चून शिक्षण घेणे आपल्याला परवडणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले
प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी गरिबीचे भांडवल न करता कष्ट करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. गरीब म्हणून जन्माला आलो असे म्हणून रडत न बसण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीशी दोन हात करून मी गरिब म्हणून मरणार नाही असा ठाम निर्धार करून उच्च शिक्षण घेऊन अधिकाराच्या मोक्याच्या जागा हस्तगत कराव्यात.त्यासाठी आपणास कोणतीही अडचण आली तरी
आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सर्व आणि सम्यक संकल्प फाऊंडेशन, नांदेड हे मार्गदर्शकाच्या भुमिकेत सदैव आपल्या पाठीशी राहील मार्गदर्शकाच्या भूमिकेत आपल्या पाठीशी सदैव उभे राहील.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ संतोष हंकारे,आर जी वाघमारे, देविदास ऐडके, विशाल महाबळे, संजय हंकारे, गौतम गायकवाड, राहुल जोंधळे, शिवाजी वाघमारे,प्रसेनजित कांबळे,लखन रायबोले यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद धनसडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष हंकारे यांनी केले तर आभार देविदास एडके यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button