Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

शिवछत्रपती विद्यालयाची मतदान जनजागृती प्रभात फेरी !

घरोघरी जागृती करू….१००टक्के मतदान करू …असा घोषणांनी जुना लोहा दुमदुमला
————————————
शिवछत्रपती विद्यालयाची जनजागृती प्रभात फेरी
———————————
लोहा (प्रतिनिधी)
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदार मतदान जनजागृती व्हावी यासाठी “स्वीप “मोहिमे अंतर्गत शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जुन्या शहरातून मतदार जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. घरोघरी एकच नारा…मतदान करा… मतदान करा…!मतदार राजा जागा हो…लोकशाहीचा धागा हो…! घरोघरी जागृती करू…१००टक्के मतदान करू ..! असा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला
लातूर लोकसभा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार , तहसीलदार परळीकर कंधार तहसीलदार गोरे यांनी लोहा-कंधार तालुक्यातील सर्व प्राचार्य -मुख्याध्यापक यांची स्वीप “अंतर्गत बैठक घेतली.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी तात्काळ अंमलबजावणी केली प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एच जी पवार तसेच शिक्षक बी एन गवाले, एस एच शेख, एस ई पवार, हरिहर धुतमल, व्ही एस गुद्धे, आर आर पिठ्ठलवाड, आर आर पारेकर, श्रीमती काळकेकर, श्रीमती आढाव, जामगे रामेश्वर ,एस आर शेटे, व्यंकट पवार, श्रीमती शेडगे, श्रीमती खरात हे उपस्थित होते
मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी मतदान जास्तीत जास्त व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्य कुटुंबातील सदस्यांना सर्वांनी मतदान केले पाहिजे यासाठी जागृती करावी तसेच स्वीप विषयी माहिती दिली कोणकोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत याची माहिती दिली तर एच.जी पवार यांनी मतदाना विषयी मार्गदर्शन केले संचलन आर आर पिठ्ठलवाड यांनी केले. या शाळेतील विद्यार्थ्यांनी जुन्या शहरातून मतदार जागृत प्रभात फेरी काढण्यात आली
उठ मतदार जागा हो…..लोकशाहीचा धागा हो….
घरोघरी एकच नारा…मतदान करा… मतदान करा…. घरोघरी जागृती करू…१००टक्के मतदान करू ..! असा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button