Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

प्रभू श्रीराम दिपोत्सवाला उदंड प्रतिसाद: प्रणिताताई म्हणाल्या धन्यवाद नांदेडकर !

प्रभूश्रीराम दीपोत्सवाला उदंड प्रतिसाद; प्राणिताताईंनी म्हणाल्या धन्यवाद नांदेडकर !

——————————————-
गोदा मातेची आरती- फटाक्यांची आतिषबाजी
—————————-
नांदेड (प्रतिनिधी )

नांदेड व जिल्ह्यात श्रीराम लल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून वातावरण धार्मिकमय झाले .देशवासीयांत पंतप्रधान मोदीजीच्या प्रति असे धाडसी खंबीर नेतृत्व पाहिजे अशी भावना निर्माण झाली .नांदेडकरांचा उत्साह अविस्मरणीय होता.भाजपाच्या महिला प्रदेश कार्यकारणी उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या पुढाकाराने बंदाघाट येथे ,भरत नाट्यम ,२२ फुटी आकर्षक रेखीव व हुबेहूब अशी श्रीराम मंदिराची साकारलेली रांगोळी आणि बंदाघाट येथे गोदावरी “ची महाआरती , आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी सगळं कसे मनमोहक व भक्तिमय होते.अविस्मरणीय असा धार्मिक सोहळयास नांदेडकरांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी धन्यवाद नांदेडकर अशी कृतज्ञता व्यक्त केली
देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकाराने ५००वर्षा नंतर आयोध्यात श्रीराम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली.संपूर्ण देश जयश्रीराम असा जयघोष करत धार्मिक भक्तिमय वातावरणात नाहून निघाला .नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद आणि जयश्रीराम जयघोषाने शहर व जिल्हा दुमदुमला या प्रतिसादा बद्दल भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी धन्यवाद व्यक्त केले
आयोध्यात श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने नांदेड मध्ये सायंकाळी “बंदा घाट गोदावरी काठ” येथे श्रीराम मंदिरा ची 22 फुटी रांगोळी,गोदाकथ दिपोत्सवाने न्याहाळून निघाला.उजेड न प्रेरणा देणारा ठरला. भव्य फटाक्यांची आकर्षक अतिष बाजी भरतनाट्य कार्यक्रम असे कार्यक्रम प्राणिताताई देवरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले हिते
. जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, महानगर जिल्हाध्यक्ष दिली कंदकुर्ते, युवानेते प्रविण पाटील चिखलीकर माजी महानगर अध्यक्ष ,प्रवीण साले, व्यंकटराव मोकले, विजय गंभीरे, चैतन्य बापू देशमुख, माजी नगरसेवक राजू गोरे, बाळू भाऊ खोमणे, डॉक्टर सचिन उमरेकर ,मनोज जाधव ,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, सुशील कुमार चव्हाण, महिला मोर्चाच्या शितलताई भालके ,महिला मोर्चाच्या महानगर अध्यक्ष श्रद्धा चव्हाण भाजपचे पदाधिकारी तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी सह हजारो श्रीरामभक्त नांदेडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button