Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

सुधाकर श्रृंगारे यांना मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत — प्रतापराव पाटील चिखलीकर !

सुधाकर श्रुंगारे यांना मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत-
– प्रतापराव पाटील चिखलीकर
——————————————–
लोहा( रत्नाकर महाबळे)
देशाला मोदीजी सारखे खंबीर नेतृत्व पाहिजे त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे.आळस बाजूला सारा.तुम्ही माझ्या सारखे नेतृत्व घडविले आहे.असे भावनिक साद घालत नांदेड मध्ये झालेल्यपु चुका टाळून गाव निहाय ग्रामपंचायत प्रमाणे प्रत्यक्ष मतदारांना भेटून विकासाचे निर्णय सांगावेत.सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन लोहा विधानसभा क्षेत्रात खासदार सुधाकर श्रुंगारे याना मागील निवडणूकी एवढेच मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन लातूरचे भाजपा निवडणूक नितीक्षक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे
लोहा शहरातील व्यंकटेश गार्डन येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे त्यांच्या प्रचारार्थ बुथ प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक पार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उमेदवार खासदार सुधाकरर शृंगारे, मराठवाडा संघटक संजय कौडगे,माजी आमदार गोविंदआण्णा केंद्रे, तुकाराम वारकड गुरुजी, पक्षाचे जेष्ठ देविदास राठोड,रिपाई (आ)
विजय सोनवणे, माणिकराव मुकदम ,माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,सचिन पाटील चिखलीकर, बाबुराव केंद्रे उमरगेकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील. भोसीकर,भाजपा तालुकाध्यक्ष किशनराव डफडे,लोहा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील.ढाकणीकर, चित्ररेखाताई गोरे, सदाशिव अंभोरे, मिलिंद शिराढोणकर, दत्ता वाले, संजय देशमुख, भगवान राठोड, औरादकारताई,जयश्रीताई मामीडवार, केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल,दता वाले, करीम शेख जफारोद्दीन बाहोद्दीन
गणेशराव सावळे, सुभाष गायकवाड, केरबा वडवळे, , बालाजी खिल्लारे, नरेंद्र गायकवाड ,उत्तम सोनकांबळे, प्रकाश तोटावार, मधुकर डांगे, गणेश उबाळे, सुरेश महाबळे, चेतन केंद्रे, अपाराव पवार, मामा गायकवाड , सुरेश गायकवाड,प्रवीण धुतमल सह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते
खासदार प्रतापराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. ही निवडणूक देशाची आहे.खासदार श्रुंगारे गावातच आले नाहीत निधीच दिला नाही अशी नाराजी व्यक्त करण्याची ही वेळ नाही त्यांनी या मतदार संघासाठी भरपूर निधी दिला आहे आपणास तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान मोदीजी याना करायचे आहे .आळस झडकून कामाला लागा व मागील निवडणूकीत जे मताधिक्य आपण दिले होते तेवढे मताधिक्य द्यायचे आहे आपण माझ्या सारख्या कार्यकर्त्याला घडविले आहे अशी भावनिक साद घालत उमेदवार श्रुंगारे याना मोठे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. उमेदवार श्रुंगारे यांनी आपला संपर्क कमी पडला असेल पण आपण निधी इमानेइतबारे दिला आहे चिखलीकर पिता-पुत्रांनी नेहमीच साथ दिली आहे यावेळी आपण मला मागील निवडणुकी प्रमाणेच मोठे मताधिक्य मिळेल असा आशावाद व्यक्त केला .यावेळी माजी आ गोविंद अण्णा केंद्रे, तुकाराम वरकड, माणिकराव मुकदम ,रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवणे, बालाजी धनसडे, औरादकार मॅडम यांची भाषणे झाली प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले आभार व संचलन भास्कर पवार यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button