लोहा विधानसभा क्षेत्रात मतदान यंत्र सिलिंग पुर्ण ; निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार यांची भेट !
लोहा विधानसभा क्षेत्रात मतदान यंत्र सिलिंग पूर्ण ;निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार यांची भेट
———————————————
लोहा (रत्नाकर महाबळे )
लातूर लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान होत आहे.लोहा विधानसभा क्षेत्राचा समावेश असून या मतदार संघासाठी सर्व मतदान यंत्र सिलिंग पूर्ण झाले आहे .रविवारी दुपारी लातूर लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केले निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार यांनी भेट दिली.वोटिंग मशीन सिलिंग व्यवस्थितपणे सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले
लोहा विधानसभा मतदार संघात ३३० मतदान केंद्र आहेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी कर्मचाऱ्यांना वोटिंग मशीन सिलिंग बाबत मार्गदर्शन केले नायब तहसीलदार रेखा चमणर, संजय भोसीकर, अनिल परळीकर, अशोक मोकले, उर्मिला कुलकर्णी, श्री पाठक,
गायंगे, तिरुपती मुंगरे, गंगाधर गोंटे सुरेश वनजे तलाठी मारोती कदम, समन्वयक मन्मथ थोटे,दयानंद,मळगे, सूर्यकांत पांचाळ, माधव भालेराव व टीम या सिलिंग मशीनसाठी परिश्रम घेत आहेत
लोहा मतदार संघात ३३० मतदान केंद्रासाठी वोटिंग मशीन सीलबंद करण्याचे काम शनिवार व रविवारी या दोन दिवसात पूर्ण झाले.यासाठी ३४ टीम कार्यरत होत्या ३००कर्मचारी , अधिकारी, शिपाई, पोलीस कर्मचारी असा स्टॉप यासाठी कार्यरत होता
निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार याची भेट
————————————————————
लातूर लोकसभेचे निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार यांनी लोहा तहसील कार्यालयात रविवारी दुपारी भेट दिली. मतदान यंत्र सिलिंग कामकाज त्यांनी पाहिले सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या नियोजनाची निवडणूक निरीक्षक यांनी प्रशंसा केली.तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे याने मार्गदर्शना खाली हे सिलिंग पूर्ण झाले.तसेच मतदान करताना अडचण आली किंवा बिघाड झाला तर राखीव मतदान यंत्र सज्ज ठेवण्यात आले त्याचेही सिलिंग पूर्ण झाले आहे .विधानसभा मतदार संघात मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी सांगितले यावेळी तहसीलदार परळीकर निवडणूक समन्वयक मन्मथ थोटे उपस्थित होते

