Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

एकत्रित कुटुंब पद्धती आजच्या काळाची गरज — प्राचार्या डॉ प्रतिभा बंडेवार !

एकत्रित कुटुंब पद्धती आजच्या काळाची गरज –प्राचार्या डॉ प्रतिभा बंडेवार
——————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
बदलत्या काळात सोशल माध्यमामुळे कुटुंब , व्यक्ती -नाते -यांची संवाद कमी झाला .त्यातील जिव्हाळा आपुलकी, आदरभाव , यात अंतर पडत आहे.एकत्रित कुटुंबात संस्कारा बरोबर जीवनशैली व त्यासमोरील आव्हाने , सामाजिक जाणिव जागृतीकोणत्या हे आपसूकच मिळायचे पण हल्ली विभक्त कुटूंबात हे सगळे हळूहळू कमी होताना दिसते आहे त्यातून कौटुंबिक कलह -वाद विवाद वाढत आहेत .धावपळीच्या काळात एकत्रित कुटूंब पद्धती आवश्यक आहे असे प्रतिपादन नांदेड विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रतिभा बंडेवार यांनी केले
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार यांच्या पुढाकाराने नगरेश्वर मंदिरात प्राचार्या डॉ प्रतिभा बंडेवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले
प्रमुख पाहुणे ..सौ पुष्पा तेललवार. सौ. शिल्पा चन्नावार व सौ.रोहिणी पातेवार , होत्या
डॉ प्रतिभा बंडेवार यांनी सांगितले की,
कुटुंबात थोरल्या महिलेची भूमिका…महत्वाची असते पुढील काळात सासूचा वसा सून पुढे नेत असते,सासूने सुनेशी वागणे जिव्हाळ्याचे असायला पाहिजे. जर कुटुंबात वाद विवाद झाले तर कुटुंब दुभंगते त्यातून पती पत्नी वाद होतात लेकरांवर त्याचे परिणाम होतात त्यामुळेच
घस्फोटाचे प्रमाण वाढत असते
म्हणून नातेसंबंध टिकवण्यासाठी महिलांच्या अंगी सहनशीलता अंगी असणे गरजेचे.वडिलांची भूमिका कुटुंबात महत्वाची असते.
मागच्या पिढीचा आत्ताची पिढी आदर्श घेत असते व पुढची पिढी आदर्श घेईल या हेतूनेच नितीमुल्यांचे धडे पालकांनी मुलामुलींना द्यायला पाहिजे नव्हे
ते घरातून मिळत असतात.या सगळ्याची कटाक्षाने दक्षता घेतली पाहिजे। घरातील स्त्री चा आदर व सन्मान करणे हे घरातील पुरुष वर्गाचे कर्तव्य आहे.असे सांगून एकत्रित कुटुंब पद्धती किती गरजेची आहे , सोशल मीडियाचा कसा कौटुंबिक परिमाण चिंतनीय आहे हे डॉ प्रतिभा यांनी अधोरेखित केले .
आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश
तेललवार , व्यापारी अशोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार आर्य वैश्य युथ अध्यक्षा. सौ सपना अंकुलवार, सौ. सोनल वट्टमवार, सौ. रोहिनी पातेवार, सौ. सारिका पोपशेटवार, सौ. रुषाली कोटलवार यासह समाजातील महिलांची यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button