Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

विद्यार्थीनी वाचनाकडे जास्त लक्ष द्यावे — सिनेअभिनेते एकनाथ मोरे !

विद्यार्थ्यांनी वाचना‌कडे जास्त लक्ष द्यावे –
सिने अभिनेता एकनाथ मोरे
——————————————–
लोहा (रत्नाकर महाबळे)
विद्यार्थ्यांनी वाचनावर जास्त भर द्यावा जेणे करून आपल्या ज्ञानामध्ये अधिकची भर पडेल. तसेच भारत माझा-देश आहे. अशी प्रतिज्ञा दररोज आपण शाळेत म्हणतो त्याचा अर्थ व त्यानुसार आपले वर्तन असावे असे मार्गदर्शन सिनेअभिनेता अनिल मोरे यांनी केले.
जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वसंतराव पवार यांच्या वाढदिवसा निमित्र जून्या शहरातील शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक व खाते उघडणे हा उपक्रम राबविण्यात आला. त्याचे पासबुक वितरण आजच्या दिवशी अभिनेते व काँग्रेस नेते एकनाथ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार,माजी उपनगराध्यक्ष आयोजक सोनू संगेवार, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, शिवाजी आंबेकर, बाबासाहेब बाबर डॉ. गवळी, भारत मस्के, माजी नगरसेवक पंकज परिहार,माधव ससाणे शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार, मुख्य आयोजक गजानन दांगटे, यासह शाळेचे ,शिक्षक कर्मचारी उपस्थित होते
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या वाढदिवसा निमित्र शाळेतील विद्याथ्याच मोफत्र राष्ट्रीयकृत बँकेचे मोफत बँक पासबुक काढले या उपक्रमाचे स्वागत करत मुख्य मार्गदर्शक अभिनेते एकनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांना काव्यात्मक मार्गदर्शन करताना पाठय पुस्तकांचे वाचन करावे तसेच अवांतर वाचनाची गरज अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगितले. शालेय जीवनाच्या आठवणी सांगताना गुरुवर्य अशोक किलजे सरांमुळे आपण घडलो याची आवर्जून आठवण एकनाथ मोरे त्यांनी सांगितली.
माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविकात मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी पासबुक काढण्या मागील भूमिका व शालेय उपक्रमाची माहिती दिली.आरंभी वसंतराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ मोरे ,सोनू संगेवार व मित्रपरिवार यांनी अभिष्टचिंतन केले .सुरेख हिंदी मराठी असे काव्यात्मक संचलन बालाजी गवाले यांनी तर आभार आर. आर. पिठ्ठलवाड यांनी केले .यावेळी शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button